गुरुद्वारा बोर्डातर्फे शीख समाजान्तर्गत कोविड रुग्णांसाठी विशेष मदत सेवाकेंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:18 AM2021-04-21T04:18:14+5:302021-04-21T04:18:14+5:30
नांदेड मध्ये कोरोनाचे संक्रमण झपाट्याने पसरत आहे. शीख समाजात देखील मृत्यूंचे प्रमाण वाढलेले आहेत. तसेच आर्थिक दृष्ट्या कमकुवत आणि ...
नांदेड मध्ये कोरोनाचे संक्रमण झपाट्याने पसरत आहे. शीख समाजात देखील मृत्यूंचे प्रमाण वाढलेले आहेत. तसेच आर्थिक दृष्ट्या कमकुवत आणि गरीब लोकांची होत असलेली हेलसांड थंबविण्याच्या उद्देश्याने गुरुद्वारा बोर्डाने पुढाकार घेतला आहे. गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष स. भूपिंदरसिंघ मनहास यांनी बोर्डाचे उपाध्यक्ष स. गुरिन्दरसिंघ बावा, सचिव स. रविंदर सिंघ बुंगाई, समन्वयक स. परमज्योतसिंघ चाहल, सदस्य भाई गोबिंदसिंघ लोंगोवाल, स. मनप्रीतसिंघ कुंजीवाले, स. गुरमीतसिंघ महाजन, स. रघुवीरसिंघ विर्क, व्यवस्थापन समिति सदस्य स. गुलाबसिंघ कंधारवाले, स. नौनिहालसिंघ जहागीरदार, स. देविंदरसिंघ मोटरावाले, अधीक्षक स. गुरविंदरसिंघ वाधवा, सहायक अधीक्षक स. शरणसिंघ सोढी यांच्या सहकार्याने विशेष कोविड सेवा मार्गदर्शन केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला. सकाळी ९ वाजता पासून रात्री ९ वाजेपर्यंत, बारा तास हे सेवा केंद्र सुरु राहणार आहे. येथे कोरोना चाचणी, सिटी स्कॅन, कोरोना उपचार औषधी, बेडची उपलब्धता आदी विषयी मार्गदर्शन व मदत उपलब्ध राहील.