शिर्डी, संबलपूरसाठी नांदेड विभागातून धावणार विशेष रेल्वे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:53 AM2021-01-08T04:53:54+5:302021-01-08T04:53:54+5:30
गाडी संख्या ०८५०५ विशाखापट्टणम श्री साईनगर शिर्डी साप्ताहिक विशाखापट्टणम येथून दर गुरुवारी १४ जानेवारीपासून, तर गाडी संख्या ०८५०६ श्री ...
गाडी संख्या ०८५०५ विशाखापट्टणम श्री साईनगर शिर्डीसाप्ताहिक विशाखापट्टणम येथून दर गुरुवारी १४ जानेवारीपासून, तर गाडी संख्या ०८५०६ श्री साईनगर शिर्डी विशाखापट्टणम साप्ताहिक गाडी श्रीसाईनगर शिर्डी येथून दर शुक्रवारी १५ जानेवारीपासून चालविण्यात येणार आहे. सदर गाडी विशाखापट्टणम येथून सुटून राजमुंद्री, विजयवाडा, काझीपेठ, सिकंदराबाद, निझामाबाद, नांदेड, परभणी, औरंगाबाद, मनमाडमार्गे श्री साईनगर शिर्डीला पोहोचेल. या गाडीस २१ डबे असतील. त्याचबरोबर गाडी संख्या ०२०८५ संबलपूरनांदेड ही साप्ताहिक संबलपूर येथून दर सोमवारी, शुक्रवारी आणि रविवारी १५ जानेवारीपासून धावेल. तसेच गाडी संख्या ०२०८६ नांदेडसंबलपूर ही साप्ताहिक नांदेड येथून दर मंगळवारी, शनिवारी आणि सोमवारी १६ जानेवारीपासून चालविण्यात येणार आहे. सदर गाडी संबलपूर येथून सुटून रायगड, विशाखापट्टणम, राजमुंद्री, रायानपाडू, काझीपेत, सिकंदराबाद, निझामाबादमार्गे नांदेड येथे पोहोचेल. या गाडीस १८ डबे असतील. या दोन्ही विशेष गाड्यांचे वेळापत्रक रेल्वेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर तसेच या गाडीत प्रवास करताना भारत सरकार आणि राज्य सरकार यांनी कोविड- १९ संसर्गासंदर्भात वेळो वेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक असेल.