महाकुंभमेळ्याला जाण्याची करा तयारी; मराठवाड्यातून थेट प्रयागराजसाठी चार विशेष रेल्वे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 16:53 IST2025-01-27T16:52:38+5:302025-01-27T16:53:57+5:30
महाकुंभमेळ्यासाठी स्पेशल रेल्वे; नांदेड, सिकंदराबाद, काचिगुडा, छत्रपती संभाजीनगरातून सुटणार

महाकुंभमेळ्याला जाण्याची करा तयारी; मराठवाड्यातून थेट प्रयागराजसाठी चार विशेष रेल्वे
नांदेड : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याला जाण्याकरिता नांदेड-पटणा-नांदेड, औरंगाबाद-पटणा-औरंगाबाद, काचीगुडा-पटणा-काचीगुडा आणि सिकंदराबाद-पटणा-सिकंदराबाद विशेष रेल्वे प्रयागराज-छिवकी मार्गे चालविण्यात येत आहेत. गाडी क्रमांक (०७०९९) नांदेड ते पटणा ही विशेष गाडी नांदेड येथून १३ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता सुटेल आणि पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, खंडवा, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छिवकी, दानापूरमार्गे पटणा येथे तिसऱ्या दिवशी सकाळी १०:३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक (०७१००) पटणा ते नांदेड विशेष गाडी पटणा येथून १५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३:३० वाजता सुटेल आणि नांदेड येथे १७ फेब्रुवारी रोजी पहाटे ४:३० वाजता पोहोचेल. या गाडीत २२ डबे असतील.
गाडी क्रमांक (०७१०१) औरंगाबाद-पटणा ही विशेष गाडी औरंगाबाद येथून १९ आणि २५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता सुटेल आणि जालना, सेलू , परभणी, पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, खंडवा, इटारसी, सतना, प्रयागराज छिवकी, दानापूर मार्गे पटणा येथे तिसऱ्या दिवशी सकाळी १०:३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक (०७१०२) पटणा ते औरंगाबाद गाडी पटणा येथून २१ आणि २७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३:३० वाजता सुटेल आणि औरंगाबाद येथे अनुक्रमे २३ आणि २९ फेब्रुवारी रोजी सकाळी ७:४५ वाजता पोहोचेल. या गाडीत २२ डबे असतील.
गाडी क्रमांक (०७१०३) काचीगुडा ते पटणा मार्गे नांदेड ही विशेष गाडी काचीगुडा येथून २२ फेब्रुवारी रोजी दुपारी ४:४५ वाजता सुटेल आणि निजामाबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, खंडवा, इटारसी, सतना, प्रयागराज छिवकी, दानापूर मार्गे पटणा येथे तिसऱ्या दिवशी सकाळी १०:३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक (०७१०४) पटणा ते काचीगुडा मार्गे नांदेड ही गाडी पटणा येथून २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११:३० वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच काचीगुडा येथे २६ फेब्रुवारी राेजी सकाळी ७:०० वाजता पोहोचेल. या गाडीत २२ डबे असतील.
गाडी क्रमांक (०७१०५) सिकंदराबाद ते पटणा मार्गे नांदेड ही विशेष गाडी सिकंदराबाद येथून ७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता सुटेल आणि निजामाबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, खंडवा, सतना, दानापूर मार्गे पटणा येथे तिसऱ्या दिवशी सकाळी १०:३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक (०७१०६) पटणा ते सिकंदराबाद मार्गे नांदेड ही गाडी पटणा येथून ९ फेब्रुवारी रोजी दुपारी ३:३० वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच सिकंदराबाद येथे ११ फेब्रुवारी सकाळी ११:३० वाजता पोहोचेल. या गाडीत २० डबे असतील.