नांदेड पाईप चोरीत तपासाला गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 01:16 AM2018-03-25T01:16:40+5:302018-03-25T01:16:40+5:30

पाईप चोरी प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या सोहेल कन्स्ट्रक्शनचे मालक शेख नजीर अहमद अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नाहीत. त्याचवेळी रविवारी तेलंगणातील मेदक पोलिसांनी नांदेडमध्ये येऊन विश्वा इंजिनिअरिंग कंपनीच्या ५४ पाईपांची ओळख पटवली. तसेच या प्रकरणात गुन्ह्याचे कागदपत्रही घेतले आहे.

 Speed ​​to check Nanded Pipe | नांदेड पाईप चोरीत तपासाला गती

नांदेड पाईप चोरीत तपासाला गती

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : पाईप चोरी प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या सोहेल कन्स्ट्रक्शनचे मालक शेख नजीर अहमद अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नाहीत. त्याचवेळी रविवारी तेलंगणातील मेदक पोलिसांनी नांदेडमध्ये येऊन विश्वा इंजिनिअरिंग कंपनीच्या ५४ पाईपांची ओळख पटवली. तसेच या प्रकरणात गुन्ह्याचे कागदपत्रही घेतले आहे.
होळी प्रभागात ५ मार्चच्या रात्री पाणीपुरवठा योजनेच्या कामावर चोरीचे पाईप वापरले जात असल्याची इतवारा पोलिसांना गुप्त माहिती मिळाली. या माहितीवरुन पोलिसांनी १४ पाईप जप्त केले. तसेच प्लंबर शेख अब्दुल अजीज याला ताब्यात घेतले. त्यानंतर इतवारा, तेलंगणातील मेदक, अदिलाबाद पोलीस ठाण्यासह नांदेड महापालिकेनेही या प्रकरणात स्वतंत्रपणे चौकशी केली. अखेर नांदेडमध्ये पाईप चोरी प्रकरणात २२ मार्चच्या रात्री मुख्य कंत्राटदार शेख नजीर अहमद, उपकंत्राटदार शम्स ऊर्फ शेख नजीर अहमद आणि शेख अब्दुल अजीज या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी उपकंत्राटदार शम्स उर्फ शेख नजीर अहमद आणि शेख अब्दुल अजीज या दोघांना अटक केली. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील मुख्य कंत्राटदार असलेल्या सोहेल कन्स्ट्रक्शनचे शेख नजीर अहमद हे मात्र अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नाहीत. पाईप चोरी प्रकरणात रविवारी मेदक पोलीस नांदेडमध्ये दाखल झाले. या अधिकाऱ्यांनी इतवारा पोलिसांनी जप्त केलेल्या पाईपमधून विश्वा इंजिनिअरिंग कंपनीचे ५४ पाईप ओळखले़ इतवारा ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या कागदपत्रांची त्यांनी तपासणीही केली. त्याचवेळी आदिलाबाद पोलिसांनी शनिवारी नांदेडमध्ये येऊन चोरी प्रकरणाची माहिती घेतली. आदिलाबादमधील मेघा कंपनीचे ३१ पाईप असल्याचे यावेळी उघड झाले. अटक केलेल्या दोघांना पोलीस कोठडी मागताना इतवारा पोलिसांनी या प्रकरणात मोठी साखळी असल्याचा संशय व्यक्त केला आहे़

पाणीपुरवठा कामाच्या नव्याने निविदा
होळी येथे दलितवस्ती निधीतून पाणीपुरवठा योजनेचे काम केले जात होते.मात्र या कामावर चोरीचे पाईप वापरले जात असल्याचा प्रकार पुढे आला. परिणामी महापालिकेने हे काम रद्द करीत काम करणाºया सोहेल कन्स्ट्रक्शनवर काळ्या यादीत टाकण्याची कारवाई केली होती. त्यानंतर महापालिकेने सदर कामाची निविदा प्रसिद्ध केली आहे. २० लाख ७४ हजार रुपये या कामासाठी मंजूर आहेत. निविदा प्रक्रियेचा तसेच वाढीव रक्कम आल्यास तो सर्व खर्च सोहेल कन्स्ट्रक्शनकडून वसूल करण्यात येईल, असे आयुक्त गणेश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. या कामाच्या ई-निविदा भरण्याची अंतिम तारीख २६ मार्च आहे.

Web Title:  Speed ​​to check Nanded Pipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.