लसीकरणाची कासवगती, ४३२ पैकी मोजक्याच केंद्रांवर लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:18 AM2021-05-09T04:18:31+5:302021-05-09T04:18:31+5:30
चौकट---------------- अवघ्या सात केंद्रांवर लसीकरण जिल्ह्यात आजवर ३ लाख ४१ हजार ४७७ हून अधिकजणांना लस देण्यात आली आहे. लसीकरणासाठी ...
चौकट----------------
अवघ्या सात केंद्रांवर लसीकरण
जिल्ह्यात आजवर ३ लाख ४१ हजार ४७७ हून अधिकजणांना लस देण्यात आली आहे. लसीकरणासाठी ग्रामीण भागात ४३२, तर नांदेड मनपाअंतर्गत १० केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, सध्या नांदेड शहरातील ४ आणि ग्रामीण भागातील ३ अशा ७ केंद्रांवरच लसीकरण सुरू आहे. लसीची उपलब्धता वाढली की, केंद्रांची संख्या वाढविली जाते, असे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले असून लवकरच लसीकरणाची मोहीम सुरळीत होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.
नागरिक म्हणतात.....
कोरोनाचे संकट पाहता लसीकरणाला वेग देण्याची गरज आहे; परंतु लस घेण्यासाठी गेल्यानंतर अनेक ठिकाणी लस उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे निराशा होत आहे. शासनाने जिल्हा प्रशासनाच्या मागणीनुसार लस पुरवठा करायला हवा. कोरोनाची स्थिती पाहता या मोहिमेला वेग देण्याची गरज आहे.
- दिलीप पाटील इंगोले, नांदेड.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण केंद्र सुरू व्हायला हवीत. यासाठी मागणीप्रमाणे शासनाने लस पुरवठा करण्याची आवश्यकता आहे. मात्र, तसे घडताना दिसत नाही. लसीकरण केंद्राच्या ठिकाणी नागरिकांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करायला हवे.
- शैलेश पंडित, नांदेड.
लसीकरण कोणत्या केंद्रावर सुरू आहे. त्याचबरोबर कोणत्या केंद्रावर कोणती लस मिळणार आहे, अशी ग्रामीण तसेच शहरी भागातील माहिती प्रशासनाने दररोज जाहीर करायला हवी. असे केल्यास लसीकरणाची मोहीम सुरळीत होईल. माहितीअभावी नागरिक हेलपाटे मारताना दिसतात.
- अमोल लोया, नांदेड.
आतापर्यंतचे लसीकरण- ३,४१,४७७
पहिला डोस - २,९८,२०२
दुसरा डोस- ४३,२७५
आरोग्य कर्मचारी - २९,१८१
फ्रंट लाईन वर्कर- ३८३६७
ज्येष्ठ नागरिक-
पहिला डोस - २४९६८९
दुसरा डोस - २४२४०
चौकट----------------
अत्यल्प पुरवठा ही अडचण
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या नेतृत्वाखाली लसीकरण मोहिमेची जिल्ह्यात जय्यत तयारी करण्यात आली आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून मागणी केल्याप्रमाणे लसीचा पुरवठा होत नसल्याने ही मोहीम जिल्ह्यात संथगतीने सुरू आहे. राज्य शासनाने लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी वाढीव पुरवठा करण्याची मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.
कोणती लस कुठे उपलब्ध
महानगरपालिकेने मनपाअंतर्गत सुरू असलेल्या लसीकरण केंद्रावर कोणती लस कुठे उपलब्ध आहे याची माहिती जाहीर केली आहे. मात्र, ग्रामीण भागातील लसीकरण केंद्राबाबतची पुरेशी माहिती उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना लसीकरणासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. जिल्हा परिषद, आरोग्य विभागाने यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.