लायन्स परिवारातर्फे आयोजित पतंग महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:16 AM2021-01-18T04:16:20+5:302021-01-18T04:16:20+5:30

माजी मंत्री डॉ. डी.पी. सावंत, कार्यक्रमाचे अध्यक्ष ओमप्रकाश पोकर्णा यांच्या हस्ते पतंग उडवून करण्यात आला. यावेळी ला. अनिल तोष्णीवाल, ...

Spontaneous response to the Kite Festival organized by the Lions family | लायन्स परिवारातर्फे आयोजित पतंग महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

लायन्स परिवारातर्फे आयोजित पतंग महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next

माजी मंत्री डॉ. डी.पी. सावंत, कार्यक्रमाचे अध्यक्ष ओमप्रकाश पोकर्णा यांच्या हस्ते पतंग उडवून करण्यात आला. यावेळी ला. अनिल तोष्णीवाल, नवल पोकर्णा, विजय गंभीरे, अशोक पाटील धनेगावकर, राज यादव, संदीप माईंड यांची प्रमुख उपस्थिती होती. संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी पतंग महोत्सव घेण्यामागणी भूमिका व स्पर्धेचे नियम आपल्या प्रास्ताविकातून स्पष्ट केले. लॉयन्स क्लब नांदेड मिडटाऊनचे अध्यक्ष डॉ. जुगलकिशोर अग्रवाल, लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रलचे अध्यक्ष ला. संजय अग्रवाल, प्रोजेक्ट चेअरमन ला. शिरीष कासलीवाल, कोषाध्यक्ष ला. शिरीष गिते आणि ला. सुनिल साबू यांनी प्रमुख अतिथींचे मोत्यांच्या माळा टाकून स्वागत केले. स्पर्धेमध्ये १३७ स्पर्धकांनी सहभाग घेतला. पुरुषांच्या गटात मनीष माखन, सुशील महिंद्रकर, ओम प्रकाश कोंडावार यांनी अनुक्रमे तीन पारितोषिके पटकावली. गायत्री गरुडकर, ईश्वरी गरुडकर, शततारका पांढरे या तिघीजणी मुली व महिलांच्या गटात सरस ठरल्या. तरुण गटात शोएब शेखने प्रथम, शुभम ठाकूरने द्वितीय तसेच आनंद गटलेवार याने तृतीय क्रमांक पटकावला. मुलांमध्ये चंद्रकेश ठाकूर पहिला, आदिराज पाटे दुसरा तर मोहम्मद उसेद तिसरा आला. प्रत्येक गटातील विजेत्यांना एक हजार, सहाशे आणि चारशे रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आली. सर्व विजेत्यांमध्ये झालेल्या लक्षवेधक लढतीमध्ये ला. मनिष माकन यांनी विजय मिळवून कै. गणपतराव मोरगे यांच्या स्मरणात ठेवण्यात आलेल्या रुपये तीन हजारचे रोख बक्षीस व सर्वोत्कृष्ट पतंगबाज हा किताब पटकावला. विजेत्यांना लॉ. जयेश ठक्कर, लॉ. प्रविण अग्रवाल, लॉ. योगेश जैस्वाल, लॉ. सतीश सामते, लॉ.रवि कासलीवाल, लॉ. धनंजय डोईफोडे, लॉ. नरेश व्होरा, लॉ. ओमप्रकाश मानधने, लॉ. डॉ. विवेक मोतेवार यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली.

स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून ला. शिरीष कासलीवाल यांनी काम पाहिले. प्रा. रवि श्यामराज, लॉ.आनंदीदास देशमुख, ला. गौरव भारतीया, ला. प्रेम फेरवानी, ला. महेश चांडक यांनी वेगवेगळ्या लढतीत पंच म्हणून चोख भूमिका बजावली. काटा-काटीमध्ये कटलेले पतंग लुटण्यासाठी तरुणांनी मोठी गर्दी केली असली तरीचायना मांजा व नायलॉन मांजाला बंदी घातल्यामुळे कोणतीही दूर्घटना घडली नाही. पतंग महोत्सव यशस्वी करण्यासाठी ला.रमेश मिरजकर, ला. सुबोध जैन, ला. अशोक कासलीवाल, ला. विजय घई, ला.तेजस मोदी, ला. अमरजीतसिंघ जहागीरदार, उंटवाले, ला. आशा अग्रवाल, ला. छाया कासलीवाल, ला.. संगीता मोदी, ला. तारा कासलीवाल, ला. मिली मोदी, राजेश यादव, धीरज यादव, संतोष भारती यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Spontaneous response to the Kite Festival organized by the Lions family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.