उमरी येथील शिवसेनेच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:17 AM2020-12-22T04:17:50+5:302020-12-22T04:17:50+5:30
उमरी शहरातील मोंढा मैदानावर या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण ...
उमरी शहरातील मोंढा मैदानावर या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिबिराला सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग देशमुख गोरठेकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी व्हीपीके उद्योग समूहाचे चेअरमन तथा माजी जि. प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी, सुभाष पाटील कोळगावकर, पारसमल दर्डा, ‘छावा’चे तालुकाध्यक्ष राजेश जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. शिवसेना तालुकाप्रमुख सुभाष पेरेवार यांनी सर्व रक्तदाते व मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी सेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक पाटील जोगदंड, शिवसेना किसान आघाडीचे तालुकाध्यक्ष शिवाजी शिंदे, अशोक लोध, विजय चव्हाण, सुनीता राजेश जाधव, बळी उमरीकर, विशाल आचकुलवार, ज्ञानेश्वर मामडे, साई खांडरे, कृष्णा खांडरे, संतोष गंगासागरे, विनोद वर्मा, सोनू अहिरे, शेख मुजाहिद, अमोल कसबे, आकाश भुजबळे, अवधूत भुजबळे, रमेश ढगे, श्रीराम गिरी, राकेश पेरेवार, विठ्ठल ढगे, सचिन पबितवार, शंकर रासेवाड, शेख शरीफ, गोविंद बुलबुले, शेख माजिद, चक्रधर भोसले, माधव नव्हाते, मनोज उमरीकर, वामन गुडमेवार, बाबू दांडेवाड, दामोदर लाभसेटवार, गीताजी आळणे, सय्यद जमील आदींसह अनेक युवक कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी रक्तदान केले.
उमरी ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने डॉ. शिल्पा भडांगे, सुरेश टंकणवार, किशोर ठोकरे, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड रक्तपेढी विभागाच्यावतीने डॉ. शीतल गदाळे, विजय खरात, सूर्यकांत नागरगोजे, अतुल साकसोंडे, शेख हमीद, बाबूराव गायकवाड आदींनी रक्त संकलनासाठी परिश्रम घेतले.