एसटी प्रशासनाला ‘आषाढी’त कर्मचारी संपाची धास्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 04:38 AM2018-07-19T04:38:45+5:302018-07-19T04:38:59+5:30
परिवहन मंत्र्यांकडून एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्यास टाळाटाळ होत असल्याच्या निषेधार्थ ऐन आषाढी एकादशी यात्रेदरम्यान एसटी कर्मचारी संपावर जातील
नांदेड : परिवहन मंत्र्यांकडून एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्यास टाळाटाळ होत असल्याच्या निषेधार्थ ऐन आषाढी एकादशी यात्रेदरम्यान एसटी कर्मचारी संपावर जातील, अशी धास्ती एसटी प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी पत्र काढून योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना विभाग नियंत्रकांना दिल्या आहेत़
कर्मचाºयांचा वेतनवाढीचा संघर्ष अजूनही कायम असून योग्य वेतनवाढ मिळण्याची कर्मचाºयांना अपेक्षा आहे़ आषाढी एकादशी यात्रेदरम्यान पुन्हा एकदा संप पुकारून एसटी प्रशासन आणि परिवहनमंत्र्यांना धक्का देण्याची चर्चा कर्मचाºयांमध्ये सुरू आहे़ यात्रा कालावधीत कोणी कर्मचाºयांनी संपात भाग घेतला तर त्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, वेळप्रसंगी गृहरक्षक, पोलीस विभागाची मदत घेण्याचे पत्रात म्हटले आहे़