लालपरी लाेकवाहिनी; एसटीच्या ५५ हजार फेऱ्या लवकरच धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 07:03 PM2021-06-23T19:03:41+5:302021-06-23T19:05:47+5:30

ST BUS एसटी महामंडळ आधीच प्रचंड ताेट्यात आहे. त्यात गेल्या दीड वर्षापासून काेराेनामुळे एसटी जवळजवळ बंदच असल्याने हा ताेटा वाढला आहे.

ST Bus Lalpari Lakvahini; 55,000 rounds of ST BUS will run soon | लालपरी लाेकवाहिनी; एसटीच्या ५५ हजार फेऱ्या लवकरच धावणार

लालपरी लाेकवाहिनी; एसटीच्या ५५ हजार फेऱ्या लवकरच धावणार

Next
ठळक मुद्देग्रामीण प्रवाशांना दिलासा मिळणारउत्पन्न २२ काेटींवरून साडेसात काेटी

नांदेड : काेराेना महामारी व लाॅकडाऊनमुळे एसटीच्या फेऱ्यांची गती कमालीची मंदावली हाेती; परंतु आता लवकरच सुमारे ५५ हजार फेऱ्या सुरू हाेणार आहेत. पूर्वीप्रमाणेच गावागावांत एसटी धावणार असल्याने ग्रामीण प्रवाशांना माेठा दिलासा मिळणार आहे. ( 55,000 rounds of ST BUS will run soon) 

काेराेनाकाळात गेल्या दीड वर्षापासून एसटीला जणू घरघर लागली हाेती; परंतु आता बहुतांश जिल्ह्यात अनलाॅक हाेत असल्याने एसटीच्या फेऱ्या पुन्हा सुरू झाल्या आहेत. राज्यात काेराेनापूर्वी दरदिवशी एसटीच्या ८५ हजार फेऱ्या हाेत हाेत्या. सध्या लांब पल्ला, जिल्हा ते तालुका आणि तालुका ते तालुका, अशा सुमारे ३० हजार फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, त्याला प्रवाशांचा पाहिजे तसा प्रतिसाद नाही. हा प्रतिसाद वाढताच उर्वरित ५५ हजार फेऱ्याही टप्प्याटप्प्याने सुरू केल्या जाणार आहेत.प्रवाशांचा प्रतिसाद वाढावा यासाठी एसटी महामंडळाकडून प्रयत्न केले जात आहेत. पुढील टप्प्यात तालुका ते व्यापारी केंद्र असलेली बाजाराची माेठी गावे व नंतर गाव ते गाव एसटीने जाेडले जाणार आहे.

उत्पन्न २२ काेटींवरून साडेसात काेटी
एसटी महामंडळ आधीच प्रचंड ताेट्यात आहे. त्यात गेल्या दीड वर्षापासून काेराेनामुळे एसटी जवळजवळ बंदच असल्याने हा ताेटा वाढला आहे. एसटीचे पूर्वी दर दिवशीचे उत्पन्न २२ काेटी एवढे हाेते. आता अनलाॅकनंतर ३० हजार फेऱ्या सुरू झाल्याने हे उत्पन्न साडेसात काेटीपर्यंत पाेहाेचले आहे.

प्रवाशांचा प्रतिसाद पाहून निर्णय 
प्रवाशांचा प्रतिसाद वाढविण्यावर सर्वाधिक भर दिला जात आहे. या माध्यमातून एसटीचा ताेटा कमी करण्याचा प्रयत्न आहे. सध्या ३० हजार फेऱ्या सुरू आहेत. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून लवकरच उर्वरित ५५ हजार फेऱ्याही सुरू केल्या जाणार आहेत.
-संजय सुपेकर, महाव्यवस्थापक, एसटी वाहतूक, मुंबई-२

Web Title: ST Bus Lalpari Lakvahini; 55,000 rounds of ST BUS will run soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.