सोमवारपासून एसटी सेवा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:16 AM2021-04-05T04:16:33+5:302021-04-05T04:16:33+5:30
अहवाल मिळण्यास प्रशासनाकडून विलंब नांदेड-कोरोनाच्या रुग्णांसाठी आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात आहेत. असे असले, तरी कोरोनाचे अहवाल उशिराने येत आहेत. ...
अहवाल मिळण्यास प्रशासनाकडून विलंब
नांदेड-कोरोनाच्या रुग्णांसाठी आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात आहेत. असे असले, तरी कोरोनाचे अहवाल उशिराने येत आहेत. त्यामुळे रुग्णांना अहवालासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. प्रशासनाने अहवाल लवकर प्राप्त होतील, अशी व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.
स्नेहनगर ते श्रीनगर मुख्य स्त्याची दुरवस्था
नांदेड : शहरातील रहदारीचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीनगर मुख्य रस्त्यावर काही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत, यामुळे वाहनधारकांना याचा त्रास होत आहे. अनेक वेळा छोटे-छोटे अपघातही होत आहेत. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
रबी हंगामातील शेतमाल घरातच
नांदेड : जिल्ह्यातील रबी हंगामातील पिकांची काढणी झाली आहे. शेतातील माल सध्या तरी घरात पडून आहे. कोरोनामुळे संचारबंदी लागू केल्याने त्याचा परिणाम बाजार समितीवर झाला आहे. बाजार समितीच्या भागात आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. यामुळे बाजार समितीचे आर्थिक नुकसान होत आहे, तसेच शेतकऱ्यांनाही आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.