एसटी कामगार संघटना कार्यालयाचे टाळे उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 12:47 AM2019-03-29T00:47:06+5:302019-03-29T00:47:45+5:30
राज्य परिवहन महामंडळाच्या नांदेड विभागातील मान्यताप्राप्त संघटनेच्या कार्यालयास प्रशासनाने १५ सप्टेंबर २०१८ रोजी टाळे ठोकले होते़ संघटना कार्यालयाच्या नियमित भाडे भरणा केलेला असतानाही द्वेषातून व पूर्वग्रहदूषित हेतूने संघटना कार्यालयास टाळे ठोकण्यात आले.
नांदेड : राज्य परिवहन महामंडळाच्या नांदेड विभागातील मान्यताप्राप्त संघटनेच्या कार्यालयास प्रशासनाने १५ सप्टेंबर २०१८ रोजी टाळे ठोकले होते़ संघटना कार्यालयाच्या नियमित भाडे भरणा केलेला असतानाही द्वेषातून व पूर्वग्रहदूषित हेतूने संघटना कार्यालयास टाळे ठोकण्यात आले. याबाबत औद्योगिक न्यायालयाने हे टाळे उघडण्याचे आदेश दिले आहेत़
नांदेड विभागातील मान्यताप्राप्त संघटनेच्या संघटना कार्यालयास प्रशासनाने कुठलीही पूर्वकल्पना न देता १५ सप्टेंबर २०१८ रोजी टाळे ठोकले होते़ सदर संघटना कार्यालयाच्या नियमित भाडे भरणा केलेला असतानाही संघटना द्वेषातून व पूर्वग्रहदूषित हेतूने संघटना कार्यालयास टाळे ठोकण्यात आल्याचा आरोप करीत मान्यता प्राप्त संघटनेनी आंदोलनही छेडले़ याबाबत प्रशासनाला विचारणा केली असता नेहमीप्रमाणे उडवाउडवीची उत्तरे देण्याचे काम प्रशासनामार्फत करण्यात आले. शेवटी याबाबत संघटनेने औद्योगिक न्यायालयात धाव घेऊन महामंडळात चाललेले नियमाची पायमल्ली व प्रशासनाचे आडमुठे धोरण मा.न्यायालयाच्या निदर्शनास आणले. संघटना कार्यालय कशा नियमबाह्य पद्धतीने ताब्यात घेतले या बाबी स्पष्ट केल्या.
प्रशासनाच्या या एककल्ली कारभारावर ताशेरे ओढत संघटना कार्यालय संघटनेच्या ताब्यात देण्याचे आदेश औद्योगिक न्यायालयाने प्रशासनाला दिले. त्या आदेशान्वये आज दिनांक २८ मार्च २०१९ रोजी नांदेड विभागाचे संघटना कार्यालय संघटनेच्या ताब्यात देण्यात आले.
यावेळी केंद्रीय उपाध्यक्षा शीला संजय नाईकवाडे, विभागीय अध्यक्ष एम़ बी़ बोर्डे, विभागीय सचिव विनोद पांचाळ, विभागीय कार्याध्यक्ष संजय मादास यांच्यासह मन्मथ स्वामी, चंद्रकांत पांचाळ, गंगाधर मोगले, सारीपुत जाधव, महंमद गौस, ताजोद्दीन, भगवान चव्हाण, काजी, फारुकी, सुरेश माचनवाड, शिरेवार, गवळी, डी़ एऩ कोंढे, सविता जमदाडे, पद्मश्री राजे, सुकेशनी कुलदिपकर या निर्भया समिती सदस्य उपस्थित होत्या़
- मान्यताप्राप्त कामगार संघटनेच्या सभासदांनी जल्लोषात संघटना कार्यालय ताब्यात घेतले. फटाके वाजवून, गुलाल उधळून, पेढे वाटून, ढोल ताशाच्या गजरात संघटना कार्यालयात प्रवेश करण्यात आला. यावेळी नांदेडात विभागातील सर्व आगारातील कामगार सभासद, पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते़ दरम्यान, संघटनेच्या केंद्रीय उपाध्यक्षा शीला नाईकवाडे यांनी उपस्थित पदाधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले़