स्थायीने सुचविल्या ४६ सुधारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 12:33 AM2019-03-09T00:33:01+5:302019-03-09T00:34:15+5:30

नांदेड - वाघाळा शहर महापालिकेच्या स्थायी समितीच्या शुक्रवारी झालेल्या अर्थसंकल्पीय बैठकीत स्थायी समितीने बजेटमध्ये तब्बल ४६ सुधारणा नमूद केल्या आहेत़

Standing Recommended 46 updates | स्थायीने सुचविल्या ४६ सुधारणा

स्थायीने सुचविल्या ४६ सुधारणा

googlenewsNext
ठळक मुद्देअर्थसंकल्पीय सभा : महापालिकेच्या उत्पन्नवाढीवरही सदस्यांच्या सूचना

नांदेड : नांदेड - वाघाळा शहर महापालिकेच्या स्थायी समितीच्या शुक्रवारी झालेल्या अर्थसंकल्पीय बैठकीत स्थायी समितीने बजेटमध्ये तब्बल ४६ सुधारणा नमूद केल्या आहेत़ त्यामध्ये महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याबरोबरच विविध विकासकामांचा समावेश आहे़ परंतु अगोदरच मनपाच्या तिजोरीत खडखडाट असताना स्थायीने सुचविलेल्या नवीन कामांच्या बाबतीत प्रशासन काय निर्णय घेते हेही महत्त्वाचे आहे़
प्रशासनाने स्थायी समितीकडे बजेट सोपविल्यानंतर स्थायीच्या सदस्यांनी त्यावर दोन दिवस अभ्यास करुन सुधारणांची यादी प्रशासनाला सुपूर्द केली़ त्यात गुंठेवारी योजना पुन्हा सुरु करणे, पाणीपुरवठा, ड्रेनेज व मालमत्ता विभागाची अभय योजना सुरु करणे, मनपा हद्दीतील सर्व निवासी व अनिवासी मालमत्ता मनपा रेकॉर्डवर आणून कर वसुली करणे, नगररचना विभागाच्या कामकाजात गती आणणे, नंदीग्राम मार्केट, महात्मा फुले मार्केट, राजीव गांधी मार्केटचे पुननिर्मिती करणे, मनपाच्या इतर मोक्याच्या ठिकाणी व्यापारी संकुल उभारणे या उत्पन्नवाढीसाठीच्या सुधारणा त्यात नमूद करण्यात आल्या आहेत़
शहरवासीयांसाठी नवीन उपक्रमामध्ये गुरुनानकजी यांच्या ५५० व्या जयंतीनिमित्त शहरात येणाऱ्या भाविकांना मूलभूत सुविधा पुरविणे व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे, मनपा वर्धापन दिनानिमित्त कविसंमेलन, श्रीमघाट परिसर किंवा इतर ठिकाणी तथागत गौतम बुद्ध, महात्मा बसवेश्वर व वसंतराव नाईक यांचे पुतळे उभारणाऱ शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीने ट्रक टर्मिनल प्रकल्पाला चालना देणे़ स्मशानभूमी आणि कब्रस्तानमध्ये मूलभूत सुविधा निर्माण करणे़ मनपा मालकीच्या भूखंडांना वायर फिनिशिंग करुन फलक लावणे़ जीवनगौरव पुरस्काराची यावर्षीपासून सुरुवात करण्यात येणार आहे़ आऱ के़ लक्ष्मण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मध्यभागी कॉमन मॅनचा पुतळा उभारण्यात येणार आहे़ महापौर, आयुक्त व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी वाढीव विकास योजनेत जागा आरक्षित करुन विकसित करण्यात येणार आहे़ मनपा रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजना राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत़
अशाप्रकारे ४६ नवीन कामे स्थायी समितीने आज सुचविली़ यातील किती प्रस्तावावर प्रशासन सहमती दर्शविते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे़

  • आंतरराष्ट्रीय मानकानुसार श्री गुरुगोविंदसिंघजी स्टेडियमची खेळपट्टी व मैदान मनपा निधीतून विकसित करण्यात आले आहे़ यावर्षी पव्हेलियन, प्रेक्षक गॅलरी व इतर सुविधांकरिता नवीन डीपीआरनुसार १२० कोटी लागणार आहेत़ ते शासनाकडून मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे़ तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉकी स्टेडियम निर्माण करण्यात येणार आहे़ चौकांचे विद्रूपीकरण झाले असून त्यासाठी चौक दत्तक योजना राबविण्यात येणार आहे़ शहराच्या सौंदर्यासाठी बँका, सहकारी संस्था, दानशूर नागरिकांचा त्यात सहभाग घेतला जाणार आहे़

Web Title: Standing Recommended 46 updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.