पाच योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान वाटप सुरू; जून महिन्याचेही पैसे मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:18 AM2021-05-08T04:18:14+5:302021-05-08T04:18:14+5:30
चाैकट- १.कोरोनामुळे मागील वर्षी अनुदान वेळेवर मिळाले नाही. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. यावर्षी मात्र मागील महिन्यात ...
चाैकट-
१.कोरोनामुळे मागील वर्षी अनुदान वेळेवर मिळाले नाही. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. यावर्षी मात्र मागील महिन्यात अनुदान वाटप केले तसेच जून महिन्याचेही पैसे मे महिन्यात मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
- किरणकुमार न्यालापल्ली. नांदेड.
२.शासनाने लॉकडाऊनच्या काळात दर महिन्याला मिळणारी आर्थिक मदत वेळेवर करावी, एवढीच अपेक्षा आहे. शासनाकडून १ हजार रूपये अनुदान जाहीर केले होते. मात्र, दर महिन्याला मिळणारे पैसेच आम्हाला मिळाले आहेत. वेगळी मदत मिळाली नाही.
- कार्तिककुमार भरतीपूरम, नांदेड.
३. प्रत्येक महिन्याला मानधन कधी मिळणार, याची प्रतीक्षा आम्हाला करावी लागत होती. मात्र, गेल्या दोन महिन्यापासून वेळेवर अनुदान मिळत असल्यामुळे काही प्रमाणात अडचणी कमी झाल्या आहेत. मात्र, अनुदानाची रक्कम वाढविण्याची मागणी आहे.
- राजू इराबत्तीन, नांदेड.
४.कोरोनामुळे अनेकांची कामधंदे बुडाले आहेत. अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशावेळी आमच्यासारख्या दिव्यांगांची परिस्थिती खूप नाजूक झाली आहे. कोणी मदत करत नाही. शासनाच्या मदतीवरच आमचे जीवन अवलंबून आहे. त्यामुळे वेळेवर अनुदान मिळावे, अशी अपेक्षा आहे.
- सय्यद आरिफ.