राज्य मागासवर्ग आयोगाकडे निवेदनांचा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 11:36 PM2018-03-05T23:36:32+5:302018-03-05T23:37:27+5:30
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाने सोमवारी नांदेड येथील शासकीय विश्रामगृह येथे घेतलेल्या जनसुनावणीत शालेय विद्यार्थ्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनीच मराठा आरक्षणासंदर्भातील आपली भूमिका आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड यांच्याकडे मांडली़ यावेळी आयोगाकडे निवेदन, पुराव्यांचा अक्षरश: पाऊस पडला़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाने सोमवारी नांदेड येथील शासकीय विश्रामगृह येथे घेतलेल्या जनसुनावणीत शालेय विद्यार्थ्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनीच मराठा आरक्षणासंदर्भातील आपली भूमिका आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड यांच्याकडे मांडली़ यावेळी आयोगाकडे निवेदन, पुराव्यांचा अक्षरश: पाऊस पडला़
शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात अभ्यास करून अहवाल सादर करण्याची जबाबदारी राज्य मागासवर्ग आयोगावर सोपवली आहे़ दरम्यान, मराठवाड्यातील सर्व जाती-धर्मातील नागरिकांची तसेच मराठा समाजाची भूमिका जाणून घेण्यासाठी आयोगाच्या वतीने जिल्हास्तरावर जनसुनावणी घेण्यात येत आहे़ लातूर, उस्मानाबादनंतर सोमवारी नांदेडात आयोगाने जनसुनावणी घेतली़ यावेळी विविध सामाजिक, राजकीय संघटना, वैयक्तिक निवेदनाद्वारे मराठा आरक्षणाची मागणी करण्यात आली. यावेळी आयोगाचे सदस्य डॉ. राजाभाऊ कर्पे उपस्थित होते़
दरम्यान, काही महाविद्यालयांनी त्यांच्याकडील विद्यार्थीसंख्या आणि त्यात मराठा विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि इतर जातीतील विद्यार्थ्यांच्या संख्येच्या आकडेवारीतून मराठा समाज शैक्षणिक मागास असल्याची माहिती आयोगाकडे सादर केली़ त्याचबरोबर मराठा सेवा संघाच्या वतीने पुरावे, दाखले सादर करीत, मराठा आणि कुणबी समाज एकच असल्याचे हजारो पानांचे निवेदन आयोगाकडे सादर केले़ यावेळी जिजाऊ ब्रिगेड, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड, कुणबी मराठा महासंघ, छावा, मराठा युवा क्रांती, मराठा महासंघ, विविध बचत गटाद्वारे निवेदन देण्यात आले़ तर अनेक ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि सर्वच सदस्यांनी मिळून ग्रामपंचायतचे मराठा आरक्षण देण्यात यावे, असे ठराव आयोगाकडे सादर केले़
यावेळी आ़ हेमंत पाटील, आ़ प्रताप पाटील चिखलीकर, माजी आ़हणमंत पाटील बेटमोगरेकर, माजी जि़प़अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, बाबूराव गिºहे, उपमहापौर विनय गिरडे पाटील, आनंद चव्हाण, श्यामसुंदर शिंदे, संजय कºहाळे, जयवंत कदम, दीपक पावडे डॉ़ मीनल खतगावकर, संतुकराव हंबर्डे, दिलीपसिंह सोडी, प्रवीण साले यांच्यासह मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष प्रा़डॉग़णेश शिंदे, प्राचार्य डॉ़पंजाब चव्हाण, प्रा़संतोष देवराये, चांदोजी सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष सोपानराव क्षीरसागर, उद्धव सूर्यवंशी, नानाराव कल्याणकर, पंडित कदम, रवी ढगे, पंडित पवळे, रमेश पवार, भागवत देवसरकर, श्यामसुंदर शिंदे, संभाजी ब्रिगेडचे धनंजय सूर्यवंशी, कैलास वैद्य, सतीश जाधव पाटील, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष संतोष गव्हाणे, प्रदेशाध्यक्ष माधव देवसरकर, छावाचे पंजाबराव काळे, दशरथ कपाटे, स्वप्निल पाटील, पंकज उबाळे, इंजि़ तानाजी हुस्सेकर, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा सुरेखा पाटील रावणगावकर, वृषाली पाटील जोगदंड, मिलिंद देशमुख, कुणबी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष गिरीष जाधव, कृष्णा मंगनाळे, विद्या पाटील, सुचिता जोगदंड, मुक्ताई पवार, प्रियंका कैवारे, सोनाली पाटील आदींनी मराठा समाज कसा मागास आहे, आरक्षणाची गरज का आहे याबाबत मांडणी केली़
प्रा़राधाकिशन होगे यांनी ‘नांदेड जिल्ह्यातील मराठा समाजाच्या आर्थिक स्थितीचा अभ्यास’ हा विषय मांडला़
मुस्लिम संघटनेकडून निवेदन सादर
तहरिक ए-खुदादाद या संघटनेच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी राज्य मागासवर्ग आयोगाकडे केली आहे़ शेती-शेतमजुरी यावरच मराठा समाजाचा उदरनिर्वाह चालतो, ग्रामीण भागातील मराठा समाज आजही कसा मागास आहे यासंदर्भातील सविस्तर निवेदन संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष मकसुद पटेल यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयोगाला दिले आहे़