जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:15 AM2021-01-15T04:15:57+5:302021-01-15T04:15:57+5:30
यंत्र चालकांचे उपोषण नांदेड - महावितरणमधील यंत्र चालकांनी विविध मागण्यांसाठी औरंगाबाद प्रादेशिक विभाग कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. सुरक्षा ...
यंत्र चालकांचे उपोषण
नांदेड - महावितरणमधील यंत्र चालकांनी विविध मागण्यांसाठी औरंगाबाद प्रादेशिक विभाग कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. सुरक्षा रक्षक न देणे, पिण्याचे पाणी नसणे या समस्यांनी ऑपरेटर त्रस्त आहेत. कामाची देयके थकीत आहेत. या संदर्भात पाठपुरावा करूनही दुर्लक्ष करण्यात आल्याने यंत्र चालकांनी उपोषण सुरू केले.
मांजाविरहित पतंगोत्सव
नांदेड - खुरगाव येथील किडस् किंगडम स्कूलच्या मोकळ्या मैदानावर मांजाविरहित पतंगोत्सव साजरा करण्यात आला. रंगीबेरंगी पतंग आकाशात उडविण्यात आले. तसेच पतंग आणि दोऱ्यामुळे पशू, पक्षी, पर्यावरणाचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली. शिक्षक व शिक्षिकांनी पतंगाचा आनंद घेतला. यानिमित्ताने संचालिका संध्या माहेश्वरी यांनी सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.
दल दिनानिमित्त व्याख्यान
नांदेड - दल दिनानिमित्त मालती सभागृह चिखलवाडी येथे व्याख्यनमालेचा कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी परिवार प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. पी. डी. जोशी, तर प्रमुख पाहुणे म्हणून पीपल्स कॉलेजचे उपप्राचार्य अशोक सुद्देवाड होते. यावेळी जोशी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना पाराळकर यांनी, तर संगीता कांबळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला वंदना पाईकराव, जी. एम. पठाण, किरण कदम, पुष्पा दोंतेवार, सुनीता गजभारे, मिलिंद भदरगे, जयश्री पारळकर, शीलानंद तारू, इंद्रजित मोरे, आशा सूर्यवंशी, अश्विनी गायकवाड, नीता राजभोज, एकनाथ पाच्छे, आदी उपस्थित होते.