झाडे, ग्रॅनाइट, तंबूच चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:16 AM2021-03-15T04:16:47+5:302021-03-15T04:16:47+5:30
पन्नास हजारांसाठी विवाहितेचा छळ नांदेड : घर घेण्यासाठी माहेराहून पन्नास हजार रुपये घेऊन येण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. ...
पन्नास हजारांसाठी विवाहितेचा छळ
नांदेड : घर घेण्यासाठी माहेराहून पन्नास हजार रुपये घेऊन येण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. ही घटना तामसा येथे घडली. पीडितेला उपाशीपोटी ठेवून मारहाण करण्यात आली. या प्रकरणात वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोहेकॉ.गौस करीत आहेत.
सासरच्या मंडळीकडून गर्भपातासाठी मारहाण
नांदेड : पैशाची मागणी पूर्ण होत नसल्याने, सासरच्या मंडळीने गर्भपातासाठी विवाहितेला मारहाण केली. ही घटना भोकर येथे घडली. पीडितेला माहेराहून घर बांधकामासाठी पाच लाख रुपये घेऊन येण्याची मागणी करण्यात आली होती. मागणी पूर्ण होत नसल्यामुळे गर्भपातासाठी मारहाण करण्यात आली. आम्हाला मुलगा पाहिजे होता, मुलगी कशी झाली, म्हणून त्रास होता. या प्रकरणात पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
जिल्ह्यात दोन ठिकाणी दारू पकडली
नांदेड : हदगांव तालुक्यातील भानेगावकर चौक ते तामसा रस्त्यावर विनापरवाना करण्यात येणारी दारूची वाहतूक पोलिसांनी पकडली. १३ मार्च रोजी ही कारवाई करण्यात आली. यावेळी २ हजार ८८० रुपयांची दारू जप्त केली. या प्रकरणात तामसा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला, तर देगाव ते बारड जाणाऱ्या रस्त्यावर बिट्स कंपनीच्या कारमध्ये दारू नेण्यात येत होती. त्यातून २४ हजारांची दारू आणि दोन लाख रुपयांची कार जप्त करण्यात आली. याप्रकरणात बारड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड
नांदेड : जिल्ह्यात शिवाजीनगर आणि इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगार अड्ड्यावर धाड मारण्यात आली. केंब्रिज शाळेच्या पाठीमागे तिर्रट नावाचा जुगार सुरू होता. या ठिकाणाहून पोलिसांनी तीन हजारांची दारू जप्त करण्यात आली, तर इस्लापूर येथे रेल्वे स्टेशन परिसरात मोकळ्या जागेवर कल्याण नावाचा जुगार सुरू होता. पोलिसांनी या ठिकाणाहून अडीच हजार रुपये जप्त केले.