प्रहारचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:13 AM2020-12-09T04:13:55+5:302020-12-09T04:13:55+5:30
प्रकृती खालावली बिलोली - बेळकोणी येथील स्वस्त धान्य दुकानदाराविरुद्ध कारवाई करण्याच्या मागणीसाठी गावकरी उपोषणाला बसले आहेत. मात्र, प्रशासनाने ...
प्रकृती खालावली
बिलोली - बेळकोणी येथील स्वस्त धान्य दुकानदाराविरुद्ध कारवाई करण्याच्या मागणीसाठी गावकरी उपोषणाला बसले आहेत. मात्र, प्रशासनाने उपोषणाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे उपोषणार्थींची प्रकृती खालावली आहे. उपोषणात शंकर डाकेवार, हणमंत पोशट्टी, राजेश आदींनी सहभाग नोंदविला. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा इशारा या सर्वांनी दिला आहे.
दत्तनामाचा जप
उमरी - तालुक्यातील सिंधी येथील दत्त मंदिरात श्री १०८ गुरुमूर्ती प्रसादबन गुरू रामेश्वर बन महाराज दत्तसंस्थानच्या कृपाशीर्वादाने दत्तनाम जप सप्ताहाला सुरुवात झाली. एक कोटी नाम जपाचा संकल्प करण्यात आला. ३१ डिसेंबरपर्यंत जप सुरू राहणार आहे. कार्यक्रमासाठी सिंधीतील गावकरी परिश्रम घेत आहेत.
कामगारांना प्रशिक्षण
किनवट - येथील पालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत सफाई कर्मचारी, कंत्राटी कामगारांना प्रशिक्षण शिबीर व सुरक्षाविषयक साधने वाटप करण्यात आली. कार्यक्रमाला मुख्याधिकारी नीलेश सुंकेवार, कार्यालय अधीक्षक चंद्रकांत दुधारे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महेश सुद्दलवाड, रमेश बामणे, महेंद्र सुद्दलवाड, श्याम कलगोटुवार, गंगूबाई गंगारेड्डी यांचा मुख्याधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. चंद्रकांत दुधारे यांनी आभार मानले.
प्रशासकीय मंडळाची नियुक्ती
लोहा- तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संस्थेवर अशासकीय प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली. याबाबतचे शासन आदेश जारी झाले आहेत. प्रशासकामध्ये स्वप्नील उमरेकर, श्यामराव पवार, गंगाधर सूर्यवंशी, अनिकेत जोमेगावकर, सुधाकर सातपुते, केरबा धुळगंडे, विठ्ठल पवार, संदीप पवार, भीमराव शिंदे यांचा समावेश आहे.