मराठा आरक्षणासाठी लोह्यात रास्ता रोको

By admin | Published: November 20, 2014 02:58 PM2014-11-20T14:58:21+5:302014-11-20T14:58:21+5:30

मराठा आरक्षणप्रश्नी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने लोह्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

Stop the path of iron for the Maratha reservation | मराठा आरक्षणासाठी लोह्यात रास्ता रोको

मराठा आरक्षणासाठी लोह्यात रास्ता रोको

Next

 

लोहा : मराठा आरक्षणप्रश्नी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने लोह्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन छावाचा मोर्चा भाजीमंडई चौकात आला. भाजपा सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. नांदेड -लातूर राज्य रस्त्यावर जवळपास एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तालुकाध्यक्ष बळीराम पाटील पवार यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी संघटनेचे जिल्हा प्रवक्ता परमेश्‍वर पाटील यांनी भाजपा सरकारचा खरपूस समाचार घेतला. विद्यार्थी आघाडीचे प्रमुख माईली पाटील पवार, भास्कर पाटील, शिवराज पाटील मुंडकर, मधुकर पाटील पवार, बालाजी जाधव, बाळासाहेब जाधव, संभाजी लाडेकर, दिघे, दामाजी दुधाटे, मारोती नाईक, शिवलिंगअप्पा, शहाजी पवार, बबन वानखेडे, परमेश्‍वर पवार, दयानंद येवले, लक्ष्मण सूर्यवंशी, दीपक शेवाळे, प्रल्हाद पवार, भागवत शिंदे, राजकुमार स्वामी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनादरम्यान, लातूर- नांदेड रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या./(वार्ताहर)

Web Title: Stop the path of iron for the Maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.