लोहयात छञपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेसाठी रस्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 06:55 PM2018-06-22T18:55:59+5:302018-06-22T18:55:59+5:30
शहरातील शिवाजी चौकाच्या नियोजीत जागेत छञपती शिवाजी महाराज यांचां अश्वारूढ पुतळा बसविण्याच्या मागणीसाठी शिवाजी चौकात रस्तारोको आंदोलन करण्यात आले.
लोहा (नांदेड ): शहरातील शिवाजी चौकाच्या नियोजीत जागेत छञपती शिवाजी महाराज यांचां अश्वारूढ पुतळा बसविण्याच्या मागणीसाठी शिवाजी चौकात रस्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शहराच्या कांही भागात बंद पाळण्यात आला.
नांदेड-लातुर राष्ट्रीय महामार्गावरील चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नियोजीत पुतळ्याची जागा आहे. सदरील चौकालगत बळिराजा मार्केटची जागा आहे. या जागेत महाराजांचा पुतळा उभारणीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी मागील दोन महिन्यांपासून नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष काही नगरसेवक व नागरीक मोठ्या प्रमाणात साखळी उपोषणास करत आहेत. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. यामुळे आज सकाळी माजी आमदार रोहीदास चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शहराच्या काही भागात बंद पाळण्यात आला.
तहसीलदार डॉ. आशिषकुमार बिरादार, पोलीस निरीक्षक बी.एम. मोहिते, न.प.चे मुख्याधिकारी अशोक मोकले यांनी आंदोलकांची भेट घेतली. आंदोलनात उपनगराध्यक्ष सोनू संगेवार, स्वच्छता सभापती बाबुराव डोम, जि.प.सदस्य डॉ. कालीदास मोरे, माजी जि.प. सभापती संजय पाटील क-हाळे, नगरसेवक अनिल दाढेल, संभाजी पाटील चव्हाण, भारत पाटील पवार, पांडुरंग दाढेल, बाबासाहेब बाबर आदींसह शेकडो नागरिकांचा सहभाग होता.