सणासुदीत स्पेशल लूट थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:23 AM2021-09-08T04:23:54+5:302021-09-08T04:23:54+5:30

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातून जवळपास ८२ रेल्वे आजघडीला धावत आहेत. यामध्ये जवळपास सर्वच रेल्वे एक्स्प्रेस असून, त्यातही त्यांना ...

Stop the special loot at the festival | सणासुदीत स्पेशल लूट थांबवा

सणासुदीत स्पेशल लूट थांबवा

Next

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातून जवळपास ८२ रेल्वे आजघडीला धावत आहेत. यामध्ये जवळपास सर्वच रेल्वे एक्स्प्रेस असून, त्यातही त्यांना विशेष रेल्वे म्हणून चालविण्यात येत आहे. नियमितपणे चालविण्यात येणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या सुरू करून त्यांना स्पेशल ट्रेन म्हणून तिकीट आकारले जात आहे. यातून प्रवाशांची मोठी आर्थिक लूट सुरू असून, ती थांबविणे गरजेचे आहे.

दुप्पट भाडे कधीपर्यंत सहन करणार

नियमितपणे चालविण्यात येणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांना स्पेशल ट्रेन म्हणून चालविले जात आहे.

परंतु, स्पेशल ट्रेनच्या नावाखाली आरक्षित तिकीट काढताना दुप्पट तिकीट आकारले जात आहे.

स्पेशल ट्रेनच्या नावाखाली सुरू असलेली आर्थिक लूट कधीपर्यंत सहन करायची, असा प्रश्न प्रवासी उपस्थित करीत आहेत.

जनरल डबे कधी अनलाॅक होणार

नांदेड विभागातून जवळपास ८२ रेल्वे धावत आहेत. परंतु, आरक्षणाशिवाय प्रवासाची मुभा नाही.

परिणामी सर्वसामान्य ग्रामीण भागातील प्रवाशांना प्रवास करणे परवडणारे नाही.

त्यामुळे एक्स्प्रेस गाड्यांना असणारे जनरल डब्बे कधी सुरू होणार असा प्रश्न सर्वसामान्य मिडल क्लास प्रवाशांतून उपस्थित होत आहे.

Web Title: Stop the special loot at the festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.