वाईबाजार येथे महिलांचा पाण्यासाठी रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 12:33 AM2018-03-29T00:33:17+5:302018-03-29T00:33:17+5:30

तालुक्यातील मौजे मदनापूर-करळगाव येथील पाणीटंचाईकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी २८ मार्च रोजी वाईबाजार येथे राष्टÑीय महामार्ग क्रमांक ३६१ वर महिलांनी तीन तास रास्ता रोको आंदोलन केले.

Stop the way for women's water in Vibazar | वाईबाजार येथे महिलांचा पाण्यासाठी रास्ता रोको

वाईबाजार येथे महिलांचा पाण्यासाठी रास्ता रोको

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीक्षेत्र माहूर : तालुक्यातील मौजे मदनापूर-करळगाव येथील पाणीटंचाईकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी २८ मार्च रोजी वाईबाजार येथे राष्टÑीय महामार्ग क्रमांक ३६१ वर महिलांनी तीन तास रास्ता रोको आंदोलन केले.
आंदोलनात मदनापूर, करळगाव येथील शेकडो महिला, युवक व अबालवृद्धांचा समावेश होता. माहूरचे तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, बीडीओ यु. डी. मांदाडे यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. मांदाडे यांनी विहीर अधिग्रहण करण्याचे आश्वासन दिले. जि.प. उपाध्यक्ष समाधान जाधव यांनीही आंदोलनाची दखल घेत मंजूर चार बोअरवेलचे काम लगेच सुरु करण्याचे आदेश दिले. तहसीलदार वरणगावकर यांनी मदनापूर येथे विहीर अधिग्रहण प्रस्तावास तात्काळ मान्यता देऊन भविष्यात पाणीटंचाईची समस्या उद्भवू नये, अशी सूचना ग्रामसेवकांना केली. यावेळी वंदना आडे, इंदुबाई टनमने, वर्षा ढोले, नीता वाघाडे, सयाबाई दुधकर, इंदुबाई दालपे, विजय पेंदोर, राजू टणमने, प्रमोद कोगूरवार, स्वप्निल टनमणे, ज्ञानेश्वर दालपे, संजय अन्नमवार आदी सहभागी होते.
२० फेब्रुवारी रोजी मदनापूर येथील ललित गावंडे यांचा बोअर अधिग्रहण केल्यानंतर त्या बोअरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. मात्र २६ जानेवारीपासून विजय गावंडे यांचा बोअर अधिग्रहण केला असल्याचा खोटा अहवाल सादर केला. प्रत्यक्ष मात्र त्या बोअरवरून गावाला थेंबभरसुद्धा पाणी देण्यात आले नसल्यानेच हे आंदोलन करावे लागले असल्याचे रास्ता रोको आंदोलनाच्या प्रमुख कमलबाई रामटेके यांनी सांगितले.
उपविभागीय पोलीस अधिकारी आसाराम जहारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभिमन्यू साळुंके व सिंदखेड पोलीस ठाण्याचे स.पो.नि. शिवरकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Web Title: Stop the way for women's water in Vibazar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.