बसस्थानकावर ताटकळत बसणे थांबले; प्रत्येक बसचे कळणार ‘लाइव्ह लोकेशन’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:22 AM2021-07-07T04:22:38+5:302021-07-07T04:22:38+5:30

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने एसटीमध्ये अत्याधुनिक सेवासुविधा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही वर्षभरापूर्वी शिवशाही बस सुरू करण्यात आल्या. ...

Stopped at the bus stop; Every bus will know the 'live location'! | बसस्थानकावर ताटकळत बसणे थांबले; प्रत्येक बसचे कळणार ‘लाइव्ह लोकेशन’!

बसस्थानकावर ताटकळत बसणे थांबले; प्रत्येक बसचे कळणार ‘लाइव्ह लोकेशन’!

Next

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने एसटीमध्ये अत्याधुनिक सेवासुविधा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही वर्षभरापूर्वी शिवशाही बस सुरू करण्यात आल्या. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सशी स्पर्धा होऊ लागली आहे. दरम्यान, प्रवाशांसाठी इंटरनेट वायफाय अन् करमणुकीसाठी टीव्हीचा प्रयोग करण्यात आला. परंतु, तो यशस्वी होऊ शकला नाही. दरम्यान, प्रवाशांना आपल्या बसचे लोकेशन कळावे, यासाठी महामंडळाने नवीन सिस्टीम कार्यान्वित करण्याचा प्रयत्न चालविला आहे.

n प्रवाशांना वेळेवर माहिती मिळावी म्हणून पब्लिक इन्फाॅर्मेशन सिस्टीम पीआयएस कार्यान्वित करण्यात आली आहे.

n बसवर देखरेख ठेवण्यासाठी व्हीपीएसची मदत होणार आहे. व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम कार्यान्वित असून त्यातून वेगवेगळे रिपोर्ट काढता येतात.

n भविष्यात सदर सिस्टीमच्या माध्यमातून एक मोबाइल ॲप तयार करण्यात येणार असून प्रवाशांना त्यातून प्रत्येक अपडेट मिळू शकेल.

चालकांच्या निष्काळजीपणाला बसणार चाप

n एसटीमध्ये बसविण्यात येणाऱ्या नवीन सिस्टीममुळे चालकांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जाणार आहे. त्यामुळे आपसूकच चालकांकडून होणाऱ्या निष्काळजीपणाला चाप बसू शकतो.

n बसचे प्रत्येक लोकेशन आजघडीला आगारप्रमुख आणि स्थानकप्रमुख यांना दिसत आहे. त्याचबरोबर बसचा स्पीड, बसचे ब्रेक कोणत्या पद्धतीने मारले, रॅश ड्रायव्हिंग यासह विविध प्रकारचे जवळपास ३५ रिपोर्ट या नवीन टेक्नाॅलाॅजीचा वापर करून काढता येणार आहेत.

Web Title: Stopped at the bus stop; Every bus will know the 'live location'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.