वाळूमाफियांविरुद्ध आता कठोर कारवाई - डॉ. विपीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:33 AM2020-12-16T04:33:40+5:302020-12-16T04:33:40+5:30

मंगळवारीही सकाळपासून भनगी परिसरात वाळूमाफियांविरुद्ध कारवाई सुरूच होती. गोदावरी नदी परिसरातील शेतांमध्ये बिहारी टोळ्यांचा शोध घेण्यात आला, तर नदीपात्रातील ...

Strict action against sand mafia now - Dr. Vipin | वाळूमाफियांविरुद्ध आता कठोर कारवाई - डॉ. विपीन

वाळूमाफियांविरुद्ध आता कठोर कारवाई - डॉ. विपीन

Next

मंगळवारीही सकाळपासून भनगी परिसरात वाळूमाफियांविरुद्ध कारवाई सुरूच होती. गोदावरी नदी परिसरातील शेतांमध्ये बिहारी टोळ्यांचा शोध घेण्यात आला, तर नदीपात्रातील तराफेही नष्ट करण्यात आले.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी वाळूमाफियांविरुद्धची ही कारवाई सुरूच राहील असे स्पष्ट केले. या कारवाईदरम्यान जप्त केलेली वाळू ग्रामीण भागातील घरकुलांसाठी उपलब्ध करून दिली जाईल असे स्पष्ट केले. यासंदर्भात गटविकास अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागात घरकुलांसाठी ५ ब्रास वाळू मोफत दिली जाईल, असे स्पष्ट केले. त्याचवेळी महापालिकेलाही ही वाळू शासकीय दरात उपलब्ध करून दिली जाणार आहे. सामान्य नागरिकांनाही बांधकामासाठी शासकीय दरात वाळू दिली जाईल असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी सांगितले. यासाठी नागरिकांनी आपली मागणी तहसील कार्यालयाकडे करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात महसूल विभागाने केलेल्या कारवाईत जप्त केलेली वाळू शासकीय दरात उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Web Title: Strict action against sand mafia now - Dr. Vipin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.