गरजू बाधितांना रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी कडक निर्बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:18 AM2021-04-07T04:18:31+5:302021-04-07T04:18:31+5:30

सद्यस्थितीत सिप्रिमी, जुबी-आर, रेमेबीन, डेसरेन, कोविफॉर, रॅमडॅक, सिपला, जुबीलियंट, सनफार्मा, मायलॉन, हेट्रोड्रग्स, झायडस कॅडीला या नावाने रेमडेसिवीर युक्त औषधे ...

Strict restrictions on the availability of remedicivir injections to those in need | गरजू बाधितांना रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी कडक निर्बंध

गरजू बाधितांना रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी कडक निर्बंध

Next

सद्यस्थितीत सिप्रिमी, जुबी-आर, रेमेबीन, डेसरेन, कोविफॉर, रॅमडॅक, सिपला, जुबीलियंट, सनफार्मा, मायलॉन, हेट्रोड्रग्स, झायडस कॅडीला या नावाने रेमडेसिवीर युक्त औषधे उपलब्ध आहेत. प्रत्येक औषधाच्या किमती वेगवेगळ्या आहेत. यावर नमूद औषधाच्या किमती (एमआरपी) कंपन्यांनुसार जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्या रास्त दरात रुग्णांसाठी उपलब्ध करन द्याव्यात असे निर्देश अन्न व औषध प्रशासनाने औषध विक्रेत्यांना दिलेले आहेत. याचबरोबर या इंजेक्शनच्या कंपनीनिहाय किमती दर फलकावर त्यांच्या मेडिकल स्टोअर्सच्या दर्शनी भागात लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. या औषधाची विक्री करताना औषध विक्रेत्यांनी डॉक्टरांचे मूळ प्रिस्क्रीप्शन, रुग्णांचा कोविड पॉझिटिव्ह रिपोर्ट, सिटीस्कॅन रिपोर्ट, रुग्णांचे आधारकार्ड यांच्या प्रती घेऊनच औषधाची विक्री करावी असेही स्पष्ट केले आहे.

डॉक्टरांनी हे इंजेक्शन सूचविताना प्रिस्क्रीप्शनवर आपले नाव, शिक्षण , रजिस्ट्रेशन क्रमांक, स्वाक्षरी, रुग्णांचे नाव व तो कोविड पॉझिटिव्ह असल्याचा स्पष्ट अभिप्राय देण्यासाठीही निर्देश केले आहेत.

कोविड रुग्णांची संख्या वाढल्याने स्वाभाविकच यातील गंभीर रुग्णांसाठी या इंजेक्शनची मागणी वाढली आहे. यात दिलेल्या निर्देशाप्रमाणे नांदेड येथील कोविड रुग्णालय व त्यांच्याशी संलग्न असलेल्या औषध विक्रेत्याकडून यांची विक्री दिलेल्या दरात व गरजेप्रमाणे होते किंवा नाही हे तपासण्यासाठी तीन समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. शासनातर्फे या इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी सर्व स्तरावरून निर्देश दिले असून योग्य तो समन्वय साधला जात असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त (औषधे) रोहित राठोड यांनी सांगितले.

कोविड रुग्णांचा उपचार हे शासनाने परवानगी दिलेल्या रुग्णालयाची यादी लक्षात घेऊन ज्यांना इंजेक्शनची अत्यावश्यकता आहे अशाच रुग्णांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली रेमडेसिवीर हे इंजेक्शन घेणे गरजेचे आहे. गरज नसताना केवळ अहवाल पॉझिटिव्ह आला म्हणून हे इंजेक्शन शासनाने मान्यता न दिलेले डॉक्टर सुचवित असल्याने बाजारात मागणी वाढल्याचे दिसत आहे.

एखादे व्यावसायिक या इंजेक्शनसाठी जास्त किमतीने दर आकारत असेल तर त्याबाबत अन्न व औषध प्रशासन कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन सहायक आयुक्त यांनी केले आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून नांदेड जिल्ह्यातील जनतेला या समन्वय अधिकाऱ्यामध्ये सु. द. जिंतूरकर – ७५८८७९४९५, मा.ज.निमसे-९४२३७४९६१२, र. रा. कावळे-९९२३६६०६८५ यांचा समावेश आहे.

0000

Web Title: Strict restrictions on the availability of remedicivir injections to those in need

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.