पट्ट्यातील बातम्या.....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:17 AM2021-03-06T04:17:42+5:302021-03-06T04:17:42+5:30
नांदेड : रेल्वे स्टेशनसमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे सुशोभीकरण करण्याची मागणी रिपाइं गवई गटाच्या वतीने करण्यात आली आहे. ...
नांदेड : रेल्वे स्टेशनसमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे सुशोभीकरण करण्याची मागणी रिपाइं गवई गटाच्या वतीने करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष भगवान ढगे यांच्यासह दीपक सातोरे, पुंडलीकराव कांबळे, राहुल बनसोडे आदींनी ही मागणी केली आहे.
आरटीई प्रवेश सुरू
नांदेड : सन २०२०-२१ या वर्षासाठी आरटीई २५ टक्के ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेला प्रारंभ झाला असून, २१ मार्चपर्यंत पालकांनी अर्ज दाखल करायचे आहेत. यासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेशस्तरावर २५ टक्के जागा यामध्ये वंचित दुर्बल घटकातील मुलांमुलींसाठी राखीव आहेत.
दिव्यांगांना कर्ज देण्याची मागणी
नांदेड : दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी राज्य अपंग वित्त विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. परंतु चार वर्षापासून दिव्यांग बांधवांना कर्ज मिळालेले नाही. शासनाने दिव्यांगांना कर्ज पुरवठा करण्याची मागणी दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी केली आहे.
ऑनलाइन देयकासाठी व्यवस्था करा
नांदेड : सिडको क्षेत्रिय कार्यालयांतर्गत पाणीपुरवठा विभागासाठी केवळ सहा कर्मचारी असल्याने वसुलीसाठी तसेच तक्रार निवारणासाठी विलंब लागत आहे. त्यामुळे सिडको भागातच तक्रारीचे निवारण व्हावे म्हणून पाणीपुरवठा विभागात तात्काळ कर्मचारी नियुक्त करून ऑनलाइन देयक भरण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.
नांदेड शहरात प्रादुर्भाव वाढतोय
नांदेड : मागील काही दिवसांपासून नांदेड शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र आहे. शुक्रवारी प्राप्त झालेल्या तपासणी अहवालपैकी १२८ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. विशेष म्हणजे यातील ६८ बाधित नांदेड मनपा क्षेत्रातील असल्याने शहरवासीयांनी काळजी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
किनवटमध्ये ३५ जणांवर उपचार
नांदेड : किनवट येथेही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शुक्रवारी ॲंटिजेन तपासणीद्वारे येथील नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. तसेच सध्या किनवट येथील कोविड रुग्णालयात ३५ जणांवर उपचार सुरू आहेत. वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.