वनरक्षकासोबत झटापट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:17 AM2021-04-24T04:17:45+5:302021-04-24T04:17:45+5:30
लोहगाव येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण नांदेड : दिवंगत आ. रावसाहेब अंतापूरकर यांच्या स्थानिक विकास निधीतून लोहा गाव प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ...
लोहगाव येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण
नांदेड : दिवंगत आ. रावसाहेब अंतापूरकर यांच्या स्थानिक विकास निधीतून लोहा गाव प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. या रुग्णवाहिकेचे लोकार्पण सभापती संजय बेळगे यांच्या उपस्थितीत जितेश अंतापूरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी नायब तहसीलदार गौड, तालुका वैद्यकीय अधिकारी वाडेकर आदी उपस्थित होते.
वीज मंडळाच्या तंत्रज्ञाला धमकी
नांदेड : वीज वितरण कंपनीचे तंत्रज्ञ पांडुरंग मोरे हे ग्राहक तपासणीसाठी गेले असता आरोपीने त्यांना धक्काबुक्की करून जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मोरे यांच्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धर्माबादमधून दुचाकी लंपास
नांदेड : धर्माबाद शहरातील विश्वेश्वरनगर येथे घरासमोर लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी नरसारेड्डी राजरेड्डी चाकरोड यांनी ३२ हजार रुपयांची दुचाकी चोरीस गेल्याची फिर्याद धर्माबाद पोलीस ठाण्यात दिली असून, याप्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली आहे. अधिक तपास जमादार स्वामी करीत आहेत.
कर्जाचे आमिष दाखवून फसविले
नांदेड : शहरातील साईनगर भागातील फळ विक्रेता अब्दुल मुबान अब्दुल मजीद यास २५ लाखांचे कर्ज देण्याचे आमिष दाखवून विमा काढण्यासाठी ५० हजार रुपये बँक खात्यात टाकण्यास सांगितले; परंतु कर्ज मंजूर न करताच फिर्यादीची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.