नांदेडमध्ये विद्यार्थ्यांचा धोकादायक शाळा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 01:16 AM2017-11-30T01:16:27+5:302017-11-30T01:16:55+5:30

शिवराज बिचेवार। लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड : आपल्या पाल्याला शाळेत वेळेवर आणि आरामदायी पोहोचता यावे यासाठी शहरासह ग्रामीण भागात ...

Students of dangerous school travel in Nanded | नांदेडमध्ये विद्यार्थ्यांचा धोकादायक शाळा प्रवास

नांदेडमध्ये विद्यार्थ्यांचा धोकादायक शाळा प्रवास

googlenewsNext
ठळक मुद्देनियमांचे सर्रास उल्लंघन : वाहनांमध्ये सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत पालक अन् यंत्रणाही बेफिकीर




शिवराज बिचेवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : आपल्या पाल्याला शाळेत वेळेवर आणि आरामदायी पोहोचता यावे यासाठी शहरासह ग्रामीण भागात स्कूल बसेस सुरु झाल्या़ त्यासाठी पालक दर महिन्याला हजारो रुपये मोजतातही, परंतु या बसमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने असलेल्या उपाययोजनांबाबत मात्र पालक अनभिज्ञ असतात़ जादा पैसे कमाविण्याच्या नादात स्कूल बस, आॅटोमध्ये विद्यार्थ्यांना अक्षरश: कोंबले जाते़ त्यामुळे चिमुकल्यांचा शाळा प्रवास आनंददायी वातावरणात होण्याऐवजी भीतीच्या सावटात होतो़
शहरासह ग्रामीण भागात इंग्रजी शाळांचे पेव फुटले आहे़ या विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करण्यासाठी शाळेच्या, खाजगी बस, अ‍ॅपे, आॅटोचा वापर केला जातो़ शहरात मोठ्या इंग्रजी शाळांची संख्या २५ तर एलकेजी, यूकेजी आणि नर्सरी अशा छोट्या गटातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शाळांची संख्या जवळपास शंभरावर आहे़
या शाळांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात़ त्यामध्ये चिमुकल्या मुलांची संख्या अधिक आहे़ त्यात तीन ते चार प्रवाशांची क्षमता असलेल्या आॅटोत फ्रंटसीटवर दोन्ही बाजूंनी चार अन् पाठीमागे आठ ते दहा विद्यार्थी कोंबले जातात़ अशाप्रकारे एका आॅटोतून बारा ते सोळा विद्यार्थ्यांना शाळेत सोडले जाते़ यातील बहुतांश विद्यार्थ्यांचे अर्धे शरीर आॅटोत तर अर्धे बाहेर असते़ तर दप्तरे आॅटोच्याच खिळ्याला लटकविली जातात़ तर दुसरीकडे स्कूल बसेसची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही़ ५० विद्यार्थीसंख्या असलेल्या स्कूल बसमध्ये बहुतांश विद्यार्थ्यांना उभ्यानेच प्रवास करावा लागतो़ या बसवरील चालक, वाहक किती प्रशिक्षित आहेत? हाही संशोधनाचा विषय आहे़ अनेक बसेस, आॅटोचे चालक हे व्यसनी असतात, परंतु त्याकडेही दुर्लक्ष करण्यात येते़ शहरात तर अनेकांनी सर्रासपणे विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी मारुती व्हॅन खरेदी केल्या आहेत़ या व्हॅनद्वारे होणारी विद्यार्थ्यांची वाहतूकही असुरक्षितच आहे़, परंतु याकडे आरटीओ, पोलीस आणि पालकही कानाडोळा करतात़ महिन्याला लाखो रुपयांची उलाढाल होणाºया वाहतुकीचा मलिदाही काही जणांना मिळतो हेही त्यामागील प्रमुख कारण आहे़, परंतु या प्रकारामुळे देशाचे भविष्य असलेले चिमुकले मात्र कायम भीतीच्या सावटाखाली वावरतात़
पालकांची जबाबदारीही तेवढीच महत्वाची
४पोलीस, आरटीओ, शाळा-महाविद्यालये याकडे दुर्लक्ष करीत असले तरी, पालकही तेवढेच जबाबदार आहेत़ सकाळी आपल्या पाल्यांना रिक्षात बसविल्यानंतर तो कितपत सुरक्षित आहे, हे पाहिले जात नाही़ पालक रिक्षाचालकांना जाबही विचारत नाहीत़ पालकांकडून केले जाणारे दुर्लक्ष हे अपघाताला निमंत्रण देऊ शकते़ शालेय व्यवस्थापन समितीच्या बैठकीमध्ये पालकांनी हा विषय उचलून धरल्यास बºयाचअंशी हा प्रश्न मार्गी लागणार आहे़
डिसेंबर महिन्यात विशेष मोहिमेद्वारे वाहन तपासणी
विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया वाहनांची नियमितपणे तपासणी केली जाते़ नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही केली जाते, परंतु पालकांनीही अधिक जागरुक असणे गरजेचे आहे़ एका आॅटोमध्ये किती मुलांना बसविण्यात येते, याबाबत पालकांनी जाब विचारणे गरजेचे आहे,परंतु पालकांकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते़ प्रत्येक शाळेमध्ये शालेय वाहतूक समिती नेमण्यात आली आहे़ समितीच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य राहत असून आमचाही एक अधिकारी या समितीचा सदस्य असतो़ समितीत शाळा, संस्था, आरटीओ आणि पालक यांचे प्रतिनिधी असतात़ त्यामध्ये आरटीओकडून सूचनाही देण्यात येतात़ क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया अशा वाहनांच्या विरोधात डिसेंबर महिन्यात विशेष मोहीम सुरु करण्यात येणार आहे-विजय तिरनकर
सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी
स्कूल बसमध्ये सुरक्षा उपाययोजनांना मूठमाती
च्स्कूल बसमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या वाहनचालकाजवळ वाहतुकीचा परवाना आहे काय? तो पूर्णपणे प्रशिक्षित आहे की नाही? गुन्हेगारी प्रवृत्तीचा किंवा मनोरुग्ण आहे काय? याचीही अनेकवेळा तपासणी केली जात नाही़ त्याचबरोबर स्कूल बसमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने प्रथमोपचार पेटी, अग्निशमन यंत्रणा,आपत्कालीन मार्ग या सुरक्षेच्या मुख्य उपाययोजनांना मुूठमाती दिली जाते़ दुर्देवाने बसला अपघात झाल्यास विद्यार्थ्यांना बाहेर पडण्यासाठी त्यामुळे एकच मार्ग राहतो़ अशा परिस्थितीत मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे़

Web Title: Students of dangerous school travel in Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.