एमपीएससी परीक्षा देण्याच्या ६- ९ च्या संधीला विद्यार्थ्यांची नापसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:15 AM2021-01-02T04:15:16+5:302021-01-02T04:15:16+5:30
चौकट- अनेक विद्यार्थी सात, आठ वर्षांपासून एमपीएससी परीक्षेची तयारी करतात. अशा विद्यार्थ्यांना आता कालावधीची अट घातल्याने त्यांच्यासमोर अडथळा ...
चौकट- अनेक विद्यार्थी सात, आठ वर्षांपासून एमपीएससी परीक्षेची तयारी करतात. अशा विद्यार्थ्यांना आता कालावधीची अट घातल्याने त्यांच्यासमोर अडथळा निर्माण झाला आहे. ही अट आयोगाने रद्द करावी, अशी बहुतांशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. - श्रीराम मोटरगे, नायगाव
चौकट- ग्रामीण भागातील विद्यार्थी अनेक अडचणीवर मात करून मोठ्या शहरात एमपीएससीची तयारी करतात. अनेक जण खासगी नोकरी करत ही परीक्षा देतात. त्यामुळे त्यांना एमपीएससी होण्यासाठी वेळ लागतो. अशा विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे त्रास होणार आहे. - मारोती अकलवाड, नांदेड
चाैकट- सलग अभ्यास करून एक, दोन प्रयत्नात एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. अनेक विद्यार्थी सात, आठ वेळेस प्रयत्न करतात आणि यशस्वी होतात, अशा विद्यार्थ्यांना याचा फटका बसणार आहे. हा निर्णय मागे घ्यावा. - विनोद गायकवाड, नांदेड
चौकट- नवीन वर्षात आयोगाने एमपीएससी परीक्षेत केलेला बदल हा विद्यार्थ्यांना आवडला नाही. कारण अशा प्रकारची अट ही त्यांच्या ध्येयपूर्तीच्या आड येणारी बाब आहे. अशा कोणत्याही अटीशिवाय विद्यार्थ्यांना ही परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध झाली पाहिजे. - गणेश तुपेकर, नांदेड