कृषी विभागाच्या योजना जिल्हा परिषदेकडे वर्ग करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:19 AM2021-09-03T04:19:36+5:302021-09-03T04:19:36+5:30
शिक्षण विभागांतर्गत जिल्ह्यात ७० माध्यमिक शाळांपैकी ४८ शासकीय माध्यमिक शाळांना राजपत्रित मुख्याध्यापक पदे मंजूर होती. २०१६ पासून ही पदे ...
शिक्षण विभागांतर्गत जिल्ह्यात ७० माध्यमिक शाळांपैकी ४८ शासकीय माध्यमिक शाळांना राजपत्रित मुख्याध्यापक पदे मंजूर होती. २०१६ पासून ही पदे रिक्त आहेत. ही पदे भरावीत. १७५ केंद्रप्रमुखांची मंजूर पदे २०१४ पासून रिक्त आहेत. ती भरण्यात यावीत तर ग्रामपंचायत विभागांतर्गत एकूण १३१० ग्रामपंचायती आहेत. कामाचा विस्तार पाहता ग्रामपंचायत विभागात ४ ते ५ ग्रामसेवकांची पदे भरावित, अशी मागणी अंबुलगेकर यांनी केली.
चौकट--
पदाधिकाऱ्यांचा भत्ता वाढवा
जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, पंचायत समिती पदाधिकारी व सदस्यांच्या मानधनात वाढ करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. अध्यक्षांना २० हजार मानधन दिले जात आहे. ते ४० हजार रुपये करावेत. उपाध्यक्षांचे १५ हजारांचे मानधन ३० हजार रुपये करावेत. सभापतीचे १२ हजार रुपयावरील मानधन २५ हजार करावे, सदस्यांचे तीन हजारांचे मानधन दहा हजार करावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.