किनवटमध्ये एकाला अस्वलाला वाचविण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:24 AM2018-01-23T00:24:02+5:302018-01-23T00:24:52+5:30
दोन दिवसांपूर्वी विहिरीत पडलेल्या अस्वलाला वाचविण्यात वनखात्याच्या अधिका-यांना यश मिळाले, मात्र तेव्हा एक नव्हे तर दोन अस्वल आपआपसात खेळताना विहिरीत पडले होते, दुसºयाचा मृतदेह सोमवारी सकाळी पाण्यात तरंगताना आढळला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोधडी (ता.किनवट) : दोन दिवसांपूर्वी विहिरीत पडलेल्या अस्वलाला वाचविण्यात वनखात्याच्या अधिका-यांना यश मिळाले, मात्र तेव्हा एक नव्हे तर दोन अस्वल आपआपसात खेळताना विहिरीत पडले होते, दुसºयाचा मृतदेह सोमवारी सकाळी पाण्यात तरंगताना आढळला.
वनपरिक्षेत्र अधिकारी एम़एम़ जोगदंड यांनी दिलेल्या माहितीनुसार इंदल भिकू चव्हाण यांच्या शेतातील विहिरीत सोमवारी सकाळी ११ च्या दरम्यान अस्वल पाण्यावर तरंगताना आढळले. घटनेची माहिती मिळताच अधिकारी, कर्मचा-यांनी भेट देवून गावक-यांच्या मदतीने जाळीच्या सहाय्याने विहिरीबाहेर काढण्यात यश मिळविले.
पशूवैद्यकीय अधिकारी डॉ़इरफान शेख (दिग्रस) व डॉ़तांबारे यांनी शवविच्छेदन केले़ त्यानंतर थारा येथील वनपाल आऱ एऩ सोनकांबळे, माल्लेवार, तोटावार, वनरक्षक कांबळे, काळे, कोरडे, गावकºयांच्या उपस्थितीत मयत अस्वलावर शेतातच अंत्यसंस्कार करण्यात आले.
शनिवारी दुपारी दोन अस्वले खेळत असताना विहिरीत पडले, यातील एक जण पाण्यात बुडून तळाला गेला, तर दुसरा वर कपारीत होता.
दुस-याला त्याच दिवशी बाहेर काढण्यात आल्यानंतर तो जंगलात पळून गेला. मात्र तळाला गेलेला अस्वल दोन दिवसानंतर म्हणजे सोमवारी पाण्यावर तरंगताना आढळले. घटनेबाबत मात्र उलटसुलट चर्चा सुरु आहे. दोघांच्या झटापटीतच तो पडला का किंवा पाणी पिण्यासाठी पडला? त्यावर काही विषप्रयोग तर झाला नाही ना ? आदी प्रश्न विचारले जात आहेत. जिवंत अस्वलाला बाहेर काढताना उपस्थित एकालाही तळाचा अस्वल दिसला नाही का? असेही विचारले जात आहे.
काय म्हणतो उत्तरीय तपासणी अहवाल?
मृत अस्वलाने मध खाल्ले होते, याशिवाय बोरही त्याच्या पोटात आढळले. विहिरीतील पाणी जास्त प्रमाणात पोटात गेल्याने अस्वलाचा मृत्यू झाला- डॉ. शेख इरफान, पशू वैद्यकीय अधिकारी, दिग्रस