वीर कराटे मार्शल आर्ट अॅकॅडमी नांदेडचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:20 AM2021-03-01T04:20:24+5:302021-03-01T04:20:24+5:30
स्पर्धेचे उद्घाटन वसमत येथील डॉक्टर असोशिएशनचे अध्यक्ष डॉ.एम.आर. क्यातमवार यांनी केले. तर प्रमुख उपस्थितीत सैन्यदलात कार्यरत गीताराम मोरे, ...
स्पर्धेचे उद्घाटन वसमत येथील डॉक्टर असोशिएशनचे अध्यक्ष डॉ.एम.आर. क्यातमवार यांनी केले. तर प्रमुख उपस्थितीत सैन्यदलात कार्यरत गीताराम मोरे, माजी सैनिक सुभेदार शिवाजी वाघमारे, मेसाजी साखरे, माजी सैनिक जी.के. गायकवाड, सैनिक गंगाधर मोरे आदी उपस्थित होते. सदर ओपन चॅम्पियनशीपमध्ये पुणे, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद येथील कराटे खेळाडूंनी सहभाग नोंदविला. वीर कराटे मार्शल आर्ट नांदेडचे मुख्य प्रशिक्षक योग थेरपिस्ट डॉ. मनोज पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली कराटे खेळाडूंनी ४ गोल्ड , १० सिल्व्हर, ५ ब्रांझ मेडल जिंकून छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगेबाबांना अभिवादन करून पराक्रमाचे प्रदर्शन केले. स्पर्धेचे आयोजन संतोष नांगरे यांनी केले होते. यशस्वी खेळाडूत गोल्ड -गिरीराज पदमवार, विश्वजीत वाघमारे, ध्रुव राजूरकर, विदित गिरगावकर. सिल्व्हर- अनिकेत येलके, सोहम बच्चेवार, रुद्र पाठक, स्वराज जाधव, शिव नागठाणे, लक्ष्मी चिंचोले, हरिओम स्वग्रे, जसराजसिंग गाडीवाले, संगम बोरकर, श्रीरंग भालेराव, ब्रांझ मेडल-व्यंकटेश तांबोळी, अनुष्का नागठाणे, रवी पुराणिक, स्वरूपा वालकर, वेदांत शिंगे यांनी मेडल मिळवून नेत्रदीपक कामगिरी केली. डाॅ. संतोष जटाळे, आशिष पंत (नेहरू युवाचे युथ ऑफिसर), गजानन गोंटलवार, रत्नाकर, अशोक पांचाळ, विनीत टेकाळे, सृष्टी पांचाळ, स्नेहा वाकडे, स्वामी, गोपाल इसावे, राजू दवणे, शेख मोईन, संतोष नांगरे, अंगद कदम (महाराष्ट्र पोलीस) यांच्यासह परिसरातील सर्व क्रीडाप्रेमींनी खेळाडूंचे कौतुक केले.