गळफास लावून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:44 AM2021-01-13T04:44:01+5:302021-01-13T04:44:01+5:30

रस्त्याची पाहणी किनवट : राज्यपाल दत्तक गाव जवरला ते किनवट या नवीन रस्त्याच्या कामास आ. भीमराव केराम यांनी भेट ...

Suicide by strangulation | गळफास लावून आत्महत्या

गळफास लावून आत्महत्या

googlenewsNext

रस्त्याची पाहणी

किनवट : राज्यपाल दत्तक गाव जवरला ते किनवट या नवीन रस्त्याच्या कामास आ. भीमराव केराम यांनी भेट देऊन अभियंत्यांशी चर्चा केली. जवरला गावात ९० टक्के आदिवासी समाजाचे वास्तव्य आहे. या रस्त्यामुळे १७ कि.मी.चे अंतर कमी होणार असून किनवटवरून मांडवी, यवतमाळ, पांढरकवडा, नागपूर येथे जाणे सोयीचे होणार आहे. यावेळी केराम यांनी कामावरील मजुरांशी हितगूज करून अडचणीही समजून घेतल्या.

रक्तदान शिबीर

किनवट : बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात रासेयो विभागाच्या वतीने समाजसुधारक बळीराम पाटील यांच्या ४८ व्या स्मृती दिनानिमित्त १७ जानेवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना प्रा. पंजाब शेरे यांच्याकडे नाव नोंदणी करावी. कार्यक्रमाला डॉ. पंजाब शेरे, डॉ. आनंद भालेराव, डॉ. अंबादास कांबळे, राजेंद्र धात्रक, प्रा. सुलोचना जाधव, प्रा. पुरुषोत्तम यरडलवार, डॉ. लता पेंडलवार, किशोर आडे आदी उपस्थित राहणार आहेत.

ढोलउमरी बिनविरोध

उमरी : तालुक्यातील ढोलउमरी ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आली. याबद्दल उद्योजक मारोतराव कवळे यांनी बेबाबाई सरसे, मनीषा आईनवाड, अर्चना पावडे, मंजूषा बैनवाड, मच्छिंद्र सोनटक्के, रावसाहेब माचेवार, राजेश्वर दुस्सेवार, मंजूषाबाई पांचाळ, निर्मला गाडेकर यांचा सत्कार केला.

३०० जणांचे रक्तदान

देगलूर : अलसुलतान फाउंडेशनच्या वतीने स्व. हजरत मौलाना अनिसुरेमान मजहरी यांच्या स्मरणार्थ आयोजित रक्तदान शिबिरात ३०० जणांनी रक्तदान केले. शिबिरात नगरसेवक मुफ्ती रिफाई, सिद्दी सलीम देशमुख, शेख मेहबूब, नगरसेवक खैसर देशमुख, बिस्मिल्ला कुरेशी, शैलेश उल्लेवार, महंमद जियाउद्दीन, सय्यद बाशीद, इब्राहीम, हाफीज आयुब, हाफीक अकबर, हाफीक आतिक आदी उपस्थित होते.

संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

उमरी : अयोध्या येथे राममंदिर उभारणीच्या निधी संकलनासाठी उमरी येथील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन रमेश वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ व्यापारी विष्णू अट्टल, माजी नगराध्यक्ष संजय कुलकर्णी, गटनेते प्रवीण सारडा, लक्ष्मीकांत देशमुख, शिवाजी हेमके, शारदा हेमके, विद्या अग्रवाल, बालाजी येरावार, राजेश विभुते, गोपाल पंडित, संतोष मुटकूटवार, विजय खांडरे, विलास लोहगावे आदी उपस्थित होते.

खतगावकर यांना श्रद्धांजली

नरसी : येथील गोदावरी मनार पब्लिक स्कूलमध्ये संस्थेचे उपाध्यक्ष कै. मधुकरराव पाटील खतगावकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी प्राचार्य दुर्गाप्रसाद पांडे, चेअरमन शेषराव रोकडे, मुरलीधर बेल्लुरे, सुधाकर पांचाळ आदी उपस्थित होते. यावेळी रेखा पांडे, तेजप्रकाश तिवारी, राम सूर्यवंशी, खंडू वाघमारे, स्वाती दोमाटे, पुष्पा शेरे, बालाजी रोकडे, यादव झडके, गणेश येरडे, एस.डी. जाधव, शेख आवेज, सुरेखा वाघमारे आदी उपस्थित होते.

टेम्पोसह दारू पकडली

उमरी : चारचाकी वाहनातून अवैधरीत्या वाहतूक होणारी २२ हजार ४६४ रुपयांची दारू पोलिसांनी पकडली. टेम्पोसह एकूण २ लाख २२ हजार ४६४ रुपयांचा मुद्देमल जप्त करण्यात आला. उमरी पोलिसांनी लक्ष्मण कल्याणकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा नाेंदविला आहे.

जनावरांची संख्या घटली

भोकर : शेणखत उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांनी पाळीव जनावरे ठेवण्याचे कमी केल्याने अशांची संख्या घटली आहे. सध्या शेणखत व रासायनिक खताच्या किमती गगणाला भिडल्या. शेणखताचा वापर जास्त प्रमाणात होत नसल्याने शेतीची सुपीकता नष्ट होत आहे. सुपीकता वाढविण्यासाठी शेणखताची गरज आहे.

Web Title: Suicide by strangulation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.