सुनील पाईकराव यांची हत्या की आत्महत्या?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 12:36 AM2018-03-09T00:36:32+5:302018-03-09T00:36:37+5:30

कार्ला येथील सुनील पाईकराव ह्या २७ वर्षीय युवकाने घरकुलाच्या वादातून झालेल्या भांडणाचा ताण घेऊन २८ फेब्रुवारीला आत्महत्या केली़ तक्रार देऊनही मनाठा पोलिसांनी गुन्हाच नोंदविला नाही़ घटनेचा योग्य तपास केला असता तर ही घटनाच घडली नसती, असा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला़ सुनील पाईकराव यांची हत्या झाली की त्यांनी आत्महत्या केली?, याचीही चर्चा परिसरात दबक्या आवाजात रंगली आहे़

Suicide suicide of Sunil Pikrao? | सुनील पाईकराव यांची हत्या की आत्महत्या?

सुनील पाईकराव यांची हत्या की आत्महत्या?

googlenewsNext
ठळक मुद्देमनाठा पोलिसांची भूमिका संशयास्पद: मात्र पोलीस म्हणतात, आत्महत्याच

लोकमत न्यूज नेटवर्क
हदगाव: कार्ला येथील सुनील पाईकराव ह्या २७ वर्षीय युवकाने घरकुलाच्या वादातून झालेल्या भांडणाचा ताण घेऊन २८ फेब्रुवारीला आत्महत्या केली़ तक्रार देऊनही मनाठा पोलिसांनी गुन्हाच नोंदविला नाही़ घटनेचा योग्य तपास केला असता तर ही घटनाच घडली नसती, असा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला़ सुनील पाईकराव यांची हत्या झाली की त्यांनी आत्महत्या केली?, याचीही चर्चा परिसरात दबक्या आवाजात रंगली आहे़
२७ नोव्हेंबर २०१७ रोजी घरकुल बांधकामावरून दोन चुलत भावात वाद होवून त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. यात दोघांनाही मार लागला. यातील एकावर औरंगाबादला तर दुसºयावर नांदेड येथे उपचार करण्यात आले. आरोपीला अटक नाही़ एमसीआर नाही़ त्यामुळे फिर्यादी पोलिसांना जाब विचारू लागला़ मात्र, आरोपीचे राजकीय धागेदोरे असल्याने पोलिसांनी मयताच्या नातेवाईकाला दाद दिली नाही़ तर गावातील प्रतिष्ठित मंडळींनी ‘घरचा मामला’ म्हणून याकडे दुर्लक्ष केले. यामुळे मयत सुनील पाईकराव तणावाखाली होते, काय झाले? तक्रार करून आमचे काय केले? तुला खतमच करतो, तुझ्या अंगावर गाडीच घालतो, अशा धमक्याही त्याला देण्यात आल्या. याची तक्रार पाईकराव यांनी पोलिसांत दिली, मात्र पुरावा काय? अशी विचारणा करुन पोलिसांनी गुन्हा नोंदविण्याचे टाळले, अर्ज चौकशीसाठी ठेवून आरोपींशी ‘अर्थपूर्ण बोलणी’ सुरु केली, अन्यथा गुन्हा नोंदवितो, असा दमही भरला.
आत्महत्येचा प्रकार पाहिला तर घातपात वाटतो़ फाशी झाडाला, घरात, शेतात सहसा घेतली जाते़ परंतु सुनील पाईकराव यांनी कोरड्या विहिरीची निवड का केली? त्यांचा मृतदेह कोरड्या विहिरीत लटकलेला मिळाला़ त्यांच्या टोंगळ्याला, कमरेला जबर मार असल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद आहे. मयताचे गावातील एका महिलेशी अनैतिक संबंध होते, त्याचा वाद चव्हाट्यावर आला होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे़ सदर कुटुंब गावातच राहत नाही, ती शक्यता धूसर होते़ आत्महत्या करण्यासाठी कारण लागते़ तणावाखाली आल्याशिवाय किंवा मनासारखे न झाल्याने व्यक्ती आत्महत्या करतो, असे मानसशास्त्र सांगते.
सुनील पाईकराव यांच्या घराचे बांधकाम रखडले आहे़ दवाखाना, पोलिसांचा ससेमिरा यासाठी प्रचंड खर्च दोन्ही पार्टीला झाला.मयताने हातावर मी फिर्यादी आहे मला न्याय मिळाला नाही, असे लिहून ठेवले होते़ त्यामुळे तपासिक अधिकाºयांवरही शंका निर्माण होते़

अर्ज चौकशीवर ठेवून पोलिसांची ‘अर्थपूर्ण’ बोलणी
सुनील पाईकराव तणावाखाली होते,काय झाले तक्रार करून आमचे काय केले़? तुला खतमच करतो, तुझ्या अंगावर गाडीच घालतो, अशा धमक्याही त्याला देण्यात आल्या, मात्र पुरावा काय? अशी विचारणा करुन पोलिसांनी गुन्हा नोंदविण्याचे टाळले, अर्ज चौकशीसाठी ठेवून आरोपींशी ‘बोलणी’ सुरु केली, अन्यथा गुन्हा नोंदवितो, असा दमही भरला, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

म्हणे दोघांवरही गुन्हे दाखल केलेत...!
पोलिसांनी प्रथम फिर्यादीची बाजू घ्यायला पाहिजे़ त्यांना न्याय द्यावा ही अपेक्षा फिर्यादीची असते़ मात्र राजकीय दबावाखाली फिर्याद न घेणे, गुन्ह्याचे स्वरुप कमी होणे, आदी प्रकार मनाठा ठाण्यात नित्याचेच झाले. पोलिसांनी याप्रकरणी खंबीर भूमिका घेतली असती तर सुनील पाईकराव जिवंत राहिले असते, मात्र, आम्ही दोघांवरही गुन्हे दाखल केले आहेत़ ही आत्महत्या आहे, त्यामुळे ३०६, ३०७ चा गुन्हा दाखल करण्याचा प्रश्नच नाही़ तपास सुरू आहे़, अशी बाजू पोलीस मांडत आहेत.

Web Title: Suicide suicide of Sunil Pikrao?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.