उन्हाळी सुट्या झाल्या जाहीर; २ मे ते ११ जूनपर्यंत बंद राहणार शाळा
By प्रसाद आर्वीकर | Published: April 4, 2023 05:29 PM2023-04-04T17:29:59+5:302023-04-04T17:30:20+5:30
१२ जून २०२३ पासून नवीन शैक्षणिक सत्र सुरु होणार आहे.
नांदेड : शिक्षण संचालकांनी राज्यातील शाळांच्या उन्हाळी सुट्यांचा कालावधी जाहीर केला असून, २ मेपासून ११ जूनपर्यंत उन्हाळी सुट्यांचा कालावधी राहणार आहे.
उन्हाळा सुरु झाल्यानंतर शैक्षणिक सत्र संपून परीक्षांचा कालावधी सुरु होतो आणि परीक्षा आटोपल्यानंतर उन्हाळी सुट्यांचे वेध लागतात. सध्या नववीपर्यंतच्या परीक्षा सुरु आहेत. या परीक्षा संपल्यानंतर सहाजिकच उन्हाळी सुट्या लागणार. परंतु त्या किती तारखेपासून याविषयी उत्सूकता होती. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील यांनी या संदभार्त ३ एप्रिल रोजी आदेश काढले असून, २ मे ते ११ जूनपर्यंत शाळांना उन्हाळी सुट्या राहतील, असे जाहीर केले आहे. १२ जून २०२३ पासून नवीन शैक्षणिक सत्र सुरु होणार आहे.
३० एप्रिल रोजी परीक्षांचा निकाल
पहिली ते नववी आणि अकरावी इयत्तेचा निकाल ३० एप्रिल रोजी अथवा त्यानंतर सुटीच्या कालावधीत लावावा, असे निर्देशही या आदेशात दिले आहेत.