सफाई कामगाराकडून लाच घेताना सुपरवायझर जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:24 AM2021-02-26T04:24:09+5:302021-02-26T04:24:09+5:30
स्वारातीम विद्यापीठात सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या एकाने बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तो कामगार कै. उत्तमराव राठोड ...
स्वारातीम विद्यापीठात सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या एकाने बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तो कामगार कै. उत्तमराव राठोड आदिवासी विकास संशोधन केंद्र किनवट येथे कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत होता. कामावरून काढून टाकणार नाही, यासाठी कंपनीचा सुपरवायझर आनंद मारोतराव हंबर्डे यांनी १९०० रुपये लाच मागितल्याची तक्रार दिल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी करून तक्रारीत तथ्य असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा जुनामोंढा भागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला.
यावेळी आनंद मारोतराव हंबर्डे (रा. विष्णूपुरी नांदेड) यास १९०० रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून हंबर्डे यास अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक कल्पना बारवकर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पोलीस उपनिरीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस. एल. नितनवरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार हणमंत बोरकर, गणेश केसकर, विलास राठोड, शेख मुजीब आदींनी ही कार्यवाही केली.