आदिवासी भागातील ३१५ रुग्णांच्या झाल्या शस्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:44 AM2021-01-13T04:44:23+5:302021-01-13T04:44:23+5:30
शिबिरात एक हजार ४२८ पुरुष व एक हजार २०३ स्री अशा एकूण दोन हजार ६३१ रुग्णांची नोंदणी झाली. यात ...
शिबिरात एक हजार ४२८ पुरुष व एक हजार २०३ स्री अशा एकूण दोन हजार ६३१ रुग्णांची नोंदणी झाली. यात हृदयविकाराचे १३ रुग्ण आढळले. सिकलसेलच्या १२२ रुग्णांची तपासणी झाली त्यातील आठ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. ७६ रुग्णांची सोनोग्राफी, १६५ रुग्णांचे एक्सरे काढण्यात आले आहेत. या शिबिरात हायड्रोसील, हर्निया, अपेंडिक्स, शरीरावरील गाठी, अस्थिव्यंग व दातांचे असे लहानमोठ्या ३१५ शस्रक्रिया झाल्या. वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम धुमाळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे, डॉ. विकास जाधव, डॉ. ए.आर. जुबेरी, डॉ. आर. एस. लोंढे, डॉ. डी. जी. केंद्रे, डॉ आर. एस. ढोले, डॉ. बी. एस. तेलंग, डॉ. ओ. एल. साबळे, डॉ. आर. जी. बोडके, डॉ. ए.पी. शिंदे, डॉ. पी.जी. तोटावाड, डॉ. सुनंदा भालेराव, डॉ. भास्कर मुंगळकर यांनी परिश्रम घेतले. शिबिरासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, शल्य चिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे यांची तर स्थानिक पातळीवर तहसीलदार उत्तम कागणे, बीडीओ सुभाष धनवे आदींची उपस्थिती लाभली.