नांदेड शहरातील २२ पॅथॉलॉजीचे परवाने निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 07:33 PM2018-03-05T19:33:40+5:302018-03-05T19:34:14+5:30
पॅथॉलॉजिस्टविनाच सुरू असलेल्या नांदेड शहरातील २२ पॅथॉलॉजीचे परवाने निलंबित करण्याची कारवाई महापालिका आयुक्तांनी केली असून या कारवाईने खळबळ उडाली आहे.
नांदेड : पॅथॉलॉजिस्टविनाच सुरू असलेल्या नांदेड शहरातील २२ पॅथॉलॉजीचे परवाने निलंबित करण्याची कारवाई महापालिका आयुक्तांनी केली असून या कारवाईने खळबळ उडाली आहे. महापालिकेने केलेल्या सर्व्हेक्षणात शहरात असलेल्या १०१ पैकी २२ पॅथॉलॉजीमध्ये पॅथॉलॉजिस्टची नियुक्ती केली नसल्याचे आढळले.
पॅथॉलॉजिस्टच्या अनुपस्थितीत सुरू असलेल्या लॅब बंद करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने १२ डिसेंबर २०१७ रोजी आदेश दिले होते. त्यानंतर आरोग्य विभागाने जिल्हानिहाय अशा लॅबची यादी करण्याचे कामही सुरू केले होते. विशेष म्हणजे मानव अधिकार आयोगाने या विषयाची दखल घेतली होती. न्यायालयाच्या या आदेशाची अंमलबजावणी करीत महापालिका प्रशासनाने अशा अनधिकृत लॅबवर कारवाईचा बडगा उगारला आहे. क्षेत्रिय कार्यालयांतर्गत असलेल्या लॅबच्या तपासणीचे आदेश आयुक्तांनी क्षेत्रिय अधिकार्यांना दिले होते. त्यानंतर शहरातील २२ पॅथॉलॉजिचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
परवाने निलंबित केलेल्या पॅथॉलॉजी
१) शिव क्लिनिक लॅब, मालेगावरोड, एसबीआय बँकेसमोर २) ओम क्लिनिक लॅब, भानुश्री हॉस्पीटल, तथागतनगर पाटीजवळ, मालेगावरोड, ३) अनुसया क्लिनिकल लॅब, दरक हॉस्पीटल, भावसार चौक, ४) ओम क्लिनिक लॅब, सन्मित्र कॉलनी, हुंडीवाला हॉस्पीटल, ५) कैवल्य लॅब, चौधरी हॉस्पीटल, चैतन्यनगर, ६) साईराज क्लिनिक लॅब, डॉ. आलमपल्लेवार हॉस्पीटल, आनंदनगर ७) सिटी केअर क्लिनिक लॅब, चैतन्यनगररोड, सहयोगनगर, ८) मरहब्बा लॅब, पीरबुºहाननगर, ९) दूर्गा हॉस्पीटल लॅबोरटरी, वसंतनगर १०) माऊली क्लिनिक लॅबोरेटरी, स्वामी विवेकानंद हॉस्पीटल, नवामोंढा, ११) श्रीनिवास कॉम्प्युटराईज्ड लॅबरॉटरी, हजारी हॉस्पीटल, हिंगोलीगेट, १२) न्यू अॅक्टिव लॅब, देगलूरनाका, १३) सेवा लॅब, देगलूर नाका १४) दिशा लॅब, देगलूरनाकाल १५) युनिर्व्हसल सेवा हॉस्पीटल, देगलूर नाका, १६) नबिला लॅब, चौफाळा, १७) मेट्रो लॅब, देगलूरनाका, १८) फैज लॅब देगलूरनका, १९) मॉडर्न क्लिनिकल लॅब, ज्वारी लाईन, इतवारा. २०) देशमुख हॉस्पीटल, इतवारा. २१) अथर्व पॅथॉलॉजी लॅब, सिडको. २२) पाटणी पॅथॉलॉजी लॅब, सिडको. या पॅथॉलॉजीवर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान मंगळवारी शहरातील सर्व पॅथॉलॉजिस्टची बैठकही आयुक्त गणेश देशमुख यांनी बोलावली आहे.