नांदेड जिल्ह्यातील सपोनि दिनेश सोनसकर अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 12:54 AM2017-12-10T00:54:58+5:302017-12-10T00:55:10+5:30

नांदेड : राज्यभर पसरलेल्या डमी रॅकेट नोकर भरती घोटाळ्यात पुरावे नष्ट करणे आणि मुख्य आरोपीसोबत संगनमत करण्याच्या आरोपावरुन सपोनि दिनेश सोनसकर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला होता़ या प्रकरणात नांदेड न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर सोनसकर फरारच होते़ त्यांना शनिवारी विशेष तपास पथकाने अटक केली़

Suspended Dinesh Sonaskar of Nanded district | नांदेड जिल्ह्यातील सपोनि दिनेश सोनसकर अटकेत

नांदेड जिल्ह्यातील सपोनि दिनेश सोनसकर अटकेत

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : राज्यभर पसरलेल्या डमी रॅकेट नोकर भरती घोटाळ्यात पुरावे नष्ट करणे आणि मुख्य आरोपीसोबत संगनमत करण्याच्या आरोपावरुन सपोनि दिनेश सोनसकर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला होता़ या प्रकरणात नांदेड न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर सोनसकर फरारच होते़ त्यांना शनिवारी विशेष तपास पथकाने अटक केली़
शासकीय नोकरीसाठीच्या परीक्षेत डमी परीक्षार्थी बसवून नोकरी देण्याचा हा प्रकार २०१५ पासून सुरु होता़ नियुक्ती आदेश मिळाल्यानंतर साडेतीन ते वीस लाख रुपयापर्यंत रक्कम घेतली जात होती़ या प्रकरणात कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाल्याचे आजपर्यंतच्या तपासात उघडकीस आले आहे़ मांडवीचे योगेश जाधव यांनी हे प्रकरण उघडकीस आणले होते़ आतापर्यंत या प्रकरणात दोनशेहून अधिक गुन्हे नोंदविण्यात आले आहेत़ या प्रकरणात मुख्य आरोपी प्रबुद्ध मधुकर राठोड हा असून लातूरमधील अनेकांचा या प्रकरणात समावेश आहे़ दरम्यान, पोलीस दलात स्थानिक गुन्हे शाखेत आणि त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेत असलेल्या सपोनि दिनेश दिगंबर सोनसकर यांच्यावर भरती घोटाळ्यात पुरावे नष्ट करणे तसेच मुख्य आरोपीसोबत संगनमत करुन अपराधिक कट रचल्याच्या आरोपावरुन गुन्हा नोंदविण्यात आला होता़
याबाबत सोनसकर यांनी नांदेड सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता़ न्यायालयाने तो फेटाळल्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून सोनसकर फरार होते़ औरंगाबाद खंडपीठात त्यांनी जामिनासाठी अर्ज केला असता न्यायालयाने त्यांना पुढील तारीख दिली होती़ त्याचदरम्यान एसआयटीचे वरिष्ठ पोनि़ शंकर केंगार यांनी सोनसकर यांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची कोठडी सुनावली़

Web Title: Suspended Dinesh Sonaskar of Nanded district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.