अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वच्छता रथ; पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:20 AM2021-09-18T04:20:02+5:302021-09-18T04:20:02+5:30
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, विधानपरिषद सदस्य अमर राजुरकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहन हंबर्डे, महापौर मोहिनी येवनकर, ...
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, विधानपरिषद सदस्य अमर राजुरकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहन हंबर्डे, महापौर मोहिनी येवनकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर, समाजकल्याण सभापती ॲड. रामराव नाईक, महिला व बालकल्याण सभापती सुशीलाताई बेटमोगरेकर, पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक व्ही. आर. पाटील, जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी, विविध खात्याचे अधिकारी, कर्मचारी आदींची उपस्थिती होती. यावेळी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२१ व स्वच्छता ही सेवा या उपक्रमाचा प्रारंभ करून घडीपत्रिकेचे विमोचन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
स्वच्छता रथाव्दारे ग्रामीण भागातून जनजागृती केली जाणार आहे. हा सचित्र रथ असून यावर स्वच्छतेचे विविध संदेश देण्यात आले आहेत. ध्वनिक्षेपकाव्दारे स्वच्छताविषयक गाणे, हात धुण्याच्या पध्दती, स्वच्छतेबाबत मान्यवरांच्या संदेशासह नागरिकांना घडीपत्रिका, हॅडबिल, ब्राऊचर वाटप केले जाणार आहेत. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२१, स्वच्छता ही सेवा, घोषवाक्य स्पर्धा, स्थायित्व व सुजलाम अभियानसह सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, नादुरुस्त शौचालयाची दुरुस्ती, गावस्तरावर वैयक्तिक व सार्वजनिक शोषखड्डे तयार करणे, प्लास्टिक कचरा संकलन, ओला व सुका कचरा विलगीकरण, सार्वजनिक शौचालय, शाश्वत स्वच्छता, ग्रामसफाई, शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रभात फेरी आदी उपक्रम स्वच्छता रथाव्दारे जिल्ह्यात राबविण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक मिलिंद व्यवहारे, माहिती शिक्षण व संवाद सल्लागार नंदलाल लोकडे यांनी पुढाकार घेऊन हा रथ तयार केला आहे.