सव्वालाख बालकांना गोवर-रुबेला लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 11:37 PM2018-11-25T23:37:04+5:302018-11-25T23:39:24+5:30

शहरातील १ लाख २८ हजार ९५२ बालकांना गोवर, रुबेला लस देण्यात येणार आहे. २७ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या या विशेष मोहिमेसाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे.

Swavakal children should get the Govor-Rubella vaccine | सव्वालाख बालकांना गोवर-रुबेला लस

सव्वालाख बालकांना गोवर-रुबेला लस

Next
ठळक मुद्देआरोग्य विभाग सज्ज ८ हजार ७७३ सत्रांचे करण्यात येणार आयोजन

नांदेड : शहरातील १ लाख २८ हजार ९५२ बालकांना गोवर, रुबेला लस देण्यात येणार आहे. २७ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या या विशेष मोहिमेसाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे.
या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी जिल्हास्तरावर रॅली, भित्तीपत्रके आदींच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली आहे. पहिल्या दोन आठवड्यांत मनपा शहरी व ग्रामीण भागातील शाळांमध्ये ही मोहीम राबविली जाईल. त्यानंतर पुढील दोन आठवडे बाह्यसंपर्क नियमित लसीकरण केले जाणार आहे. मोहिमेच्या शेवटच्या आठवड्यात वंचित असलेल्या स्थलांतरित मुलांना ही लस देण्यात येईल. नऊ महिने ते पंधरा वर्षांतील मुलांना गोवर, रुबेला लसीद्वारे संरक्षित केले जाणार आहे.
नांदेड शहरातील १ लाख २८ हजार ९५२ तर संपूर्ण जिल्ह्यात १० लाख ६७ हजार ८८६ लाभार्थ्यांना ही लस दिली जाणार आहे.८ हजार ७७३ सत्रांमध्ये या मोहिमेचे आयोजन केले असून पाच आठवड्यांच्या कालावधीत ८७५ आरोग्य कर्मचाºयांमार्फत लस दिली जाणार आहे.
आतापर्यंत ह्या लस टफ या नावाने बालरोगतज्ज्ञ डॉक्टरांकडे अथवा एखाद्या शिबिरात शुल्क देऊन घ्याव्या लागत ; पण आता शासनाने या मोहिमेद्वारे मोफत देण्याची व्यवस्था केलेली आहे. लसीकरण झाल्यावर त्या लाभार्थी बालकाच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर मतदान केल्यानंतर करतात तसे मार्किंग केले जाईल. लसीकरण करताना सिरिंजचा वापर केला जाईल. प्रत्येक बालकास नवीन सिरिंज व सुई वापरून ती परत वापरण्यात येऊ नये अशी आॅटो- लॉक होऊन जाईल. सर्व इमर्जन्सी मेडिसिन असलेले कीट तेथे त्यांच्यासोबत असेल. ही सर्व दक्षता घेण्यात येणार आहे.
या मोहिमेसाठी शहरी व ग्रामीण भागासाठी ९ लाख ५० हजार डोस आवश्यक आहेत. तर महापालिका क्षेत्रासाठी २ लाख १९ हजार ७०० लस लागणार आहे. या लसीचा शासनस्तरावर पुरवठा झाल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे. मोहिमेच्या देखरेखीसाठी ग्रामीण, शहरी व महापालिका क्षेत्रात तीनशे पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत.

Web Title: Swavakal children should get the Govor-Rubella vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.