भाजपाकडून मतासाठी प्रतीकांचे राजकारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 08:02 PM2017-09-19T20:02:43+5:302017-09-19T20:04:29+5:30
निवडणुकीच्या तोंडावर इंदू मिल येथे उभारण्यात येणाºया डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्टÑीय स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले़ त्याला दोन वर्षे उलटली आहेत़, परंतु अद्यापही प्रत्यक्ष काम सुरु झाले नाही़ देशातील दलित मते मिळविण्यासाठी भाजपाकडून प्रतिकांचे राजकारण केले जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी येथे पत्रपरिषदेत केला़
नांदेड: निवडणुकीच्या तोंडावर इंदू मिल येथे उभारण्यात येणाºया डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्टÑीय स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले़ त्याला दोन वर्षे उलटली आहेत़, परंतु अद्यापही प्रत्यक्ष काम सुरु झाले नाही़ देशातील दलित मते मिळविण्यासाठी भाजपाकडून प्रतिकांचे राजकारण केले जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी येथे पत्रपरिषदेत केला़
राज्य आणि देशातील दलितांच्या मतांवर भाजपचा डोळा आहे़ त्यामुळे इंदू मिलचे घाईघाईने भूमिपूजन करण्यात आले़, परंतु भाजपचे असे वागणे आता सर्वांच्या लक्षात आले़ इंदू मिलच्या जागेवरील स्मारकाचे काम त्वरित सुरु न केल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशाराही वाघमारे यांनी दिला़
नांदेड जिल्ह्यावर काँग्रसचे वर्चस्व अबाधित आहे. जिल्ह्यातील बहुतांश संस्था, समित्यांवर काँग्रेसचीच सत्ता आहे. येत्या महापालिका निवडणुकीत सध्यातरी काँग्रेसमोर कुठलाही सशक्त प्रतिस्पर्धी नसल्याने महापालिकेत काँग्रेस बहुमताने निवडून येईल, असा विश्वासही वाघमारे यांनी यावेळी व्यक्त केला. पत्रकार परिषदेला आ. डी. पी.सावंत, आ.अमरनाथ राजूरकर, संतोष पांडागळे आदींची उपस्थिती होती.
फडणवीस हुकूमशहा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हुकूमशहा आहेत़ कल्याण-डोंबिवलीची निवडणूक सुरु असताना, आचारसंहितेचा भंग करीत त्यांनी साडेसहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते़ या निवडणुकीला दोन वर्षे लोटली आहेत, परंतु अद्याप छदामही कल्याण-डोंबिवलीला मिळाला नाही़ केवळ खोटी आश्वासने द्यायची, स्वप्ने दाखवायची अन् सत्ता मिळवायची, असा कार्यक्रम भाजपकडून राबविला जात आहे, असा आरोप वाघमारे यांनी केला.