कोरोनात वृद्धांना सांभाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:17 AM2021-04-10T04:17:36+5:302021-04-10T04:17:36+5:30
नांदेड : कोरोनाची दुसरी लाट सर्वच वयोगटातील नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. यामध्ये ११ ते २० वर्षांपासून पुढील सर्वांचा समावेश ...
नांदेड : कोरोनाची दुसरी लाट सर्वच वयोगटातील नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. यामध्ये ११ ते २० वर्षांपासून पुढील सर्वांचा समावेश आहे. परंतु, सर्वाधिक धोका हा साठी ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांना आहे. गेल्या सात दिवसात जिल्ह्यात कोरोनामुळे १७१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये साठीच्या पुढे वय असलेल्या तब्बल ११७ जणांचा समावेश आहे. त्यामुळे घराचे वैभव असलेल्या वृद्धांना सांभाळण्याची गरज आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत विशेष करुन वयोवृद्ध आणि इतर आजार असलेल्या व्यक्तींनाच अधिक धोका होता. त्यामुळे वयोवृद्धांनी घराबाहेर पडूच नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. परंतु, आता कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या लाटेमध्ये सर्वच वयोगटातील नागरिकांना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून येत आहे. तसेच तरणीबांड मुलेही कोरोनाला बळी पडली आहे. त्यातच दुसऱ्या लाटेत अवघ्या चार ते पाच दिवसात रुग्ण ऑक्सिजनवर जात आहे. त्यामुळे अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. गेल्या सात दिवसात जिल्ह्यात कोरोनामुळे १७१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये ६० वर्षांच्या पुढील तब्बल ११७ जणांचा समावेश आहे. तर मराठवाड्याचा विचार केल्यास ५९० मयतांमध्ये ३९३ जण हे ६० वर्षांपुढील आहेत. त्यामुळे पुढील काळात वृद्धांना अधिक सांभाळण्याची गरज आहे.