तलाठी बनविताे : क्लास वन अधिकाऱ्याने 16 जणांना गंडविले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2024 06:43 AM2024-12-12T06:43:34+5:302024-12-12T06:43:50+5:30

गुण वाढवून देण्याचे आमिष दाखविणाऱ्या सात जणांवर गुन्हा

Talathi is made: Class One officer cheated 16 people | तलाठी बनविताे : क्लास वन अधिकाऱ्याने 16 जणांना गंडविले

तलाठी बनविताे : क्लास वन अधिकाऱ्याने 16 जणांना गंडविले

लोकमत न्यूज नेटवर्क
मुखेड (जि. नांदेड) : तलाठी पदासह कामगार आयुक्त यांच्याकडून भरण्यात येणाऱ्या जागांवर नोकरीचे आमिष दाखवून मुखेड तालुक्यातील १६ जणांना १ कोटी १४ लाख रुपयांनी गंडविण्यात आले. या प्रकरणात मुखेड पोलिस ठाण्यात कामगार आयुक्तालयातील क्लास वन अधिकाऱ्यासह सात जणांविरुद्ध  गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

गोविंदराव गिरी यांनी या प्रकरणात मुखेड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. गिरी हे केंद्रप्रमुख असून, त्यांच्या दोन्ही मुलांना तलाठी पदावर नोकरी लावण्याचे आमिष पाहुणे असलेल्या रामदास गोपीनाथ शिंदे यांनी दाखविले होते. कामगार आयुक्त कार्यालयात असलेले क्लास वन अधिकारी पवनकुमार चव्हाण, कल्पेश रविकांत जाधव यांच्याशी ओळख करून देत अनेकांना नोकरी लावल्याचे गिरी यांना सांगितले. तलाठी पदाची परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीमार्फत गुण वाढवून देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. त्यानुसार गिरी यांनी जावेद तांबोळी याला दहा लाख रुपये दिले. त्यानंतर ११ सप्टेंबर रोजी मुंबईतील हॉटेलमध्ये बोलावून आणखी दहा लाख गिरी यांच्याकडून घेतले.

मुलाने केले होते चित्रीकरण
nगिरी यांना ११ सप्टेंबर रोजी आणखी दहा लाख रुपये घेऊन वाशी येथे बोलावण्यात आले होते. वाशीतील मार्केट यार्डात ते पैसे घेऊन थांबल्यानंतर त्याठिकाणी जावेद तांबोळी, रामदास शिंदे व कल्पेश जाधव हे आले. 
nत्या तिघांनी गिरी आणि त्यांच्या मुलाला विश्वा लॉजमध्ये नेले. याठिकाणी आरोपींना दहा लाख रुपये देत असताना गिरी यांच्या मुलाने लपून मोबाइलमध्ये चित्रीकरण केले होते.

निकाल लागला, पण मुलाचे नावच नाही
जानेवारी २०२४ मध्ये तलाठी पदाच्या परीक्षेचा निकाल लागला, मात्र त्यात यातील एकाचेही नाव नव्हते. त्यामुळे गिरी यांनी चव्हाण यांच्यासह सर्वांना फोनवरून विचारणा केली असता, त्यांनी शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर गिरी यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यावरुन सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाइलवर पाठविली गुणपत्रिका अन्...
nपवनकुमार चव्हाण याने मुलाचे गुण वाढविल्याचे सांगत त्याची प्रिंट गिरी यांच्या मोबाइलवर पाठवली. आणखी काही मुले असतील तर घेऊन येण्यास सांगितले. त्यानंतर गिरी यांनी ओळखीतील काही जणांना सांगितले. 
nसीमा जाधव, रवी राठोड, जगदीश आडे या तिघांचे ३० लाख रुपये आरोपींना देण्यात आले. अशाप्रकारे सोळा उमेदवारांकडून सात जणांनी १ कोटी १४ लाख रुपये उकळले.

Web Title: Talathi is made: Class One officer cheated 16 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.