ग्रामीण भागातील कुटूंबांना नळ जोडणी द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:11 AM2021-02-19T04:11:43+5:302021-02-19T04:11:43+5:30
गुरुवारी जि.प. अध्यक्षा यांच्या निजी कक्षात जल व्यवस्थापन व स्वच्छता समितीची बैठक मंगाराणी अंबुलगेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी ...
गुरुवारी जि.प. अध्यक्षा यांच्या निजी कक्षात जल व्यवस्थापन व स्वच्छता समितीची बैठक मंगाराणी अंबुलगेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी शिक्षण सभापती संजय बेळगे, समजकल्याण सभापती रामराव नाईक, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सुशीलाबाई हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, जिल्हा परिषद सदस्या प्रणिताताई देवरे-चिखलीकर, अरुणा कल्याणे, लक्ष्मणराव ठक्करवाड, खाते प्रमुख आदींची उपस्थिती होती. जिल्हा परिषदेच्या वतीने उद्दिष्टपूर्तीसाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित केलेला आहे; परंतु या कामात गती वाढविणे आवश्यक आहे. वैयक्तिक नळ जोडणीसह शाळा व अंगणवाड्यांमध्येही नळ जोडणी द्यावी. यावेळी त्यांनी तालुकानिहाय नळजोडणीचा आढावा घेतला. तसेच एम.एस.ई.बी.ने पूर्वकल्पना न देता अनेक शेतकऱ्यांचे वीज कनेक्श्न तोडले ते योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले. टंचाई निधी अखर्चित राहू नये याबाबत दक्षता घ्यावी. भविष्यात पाणीटंचाई भासणार नाही यावर उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केल्या.