सेना-भाजपाला धडा शिकवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 12:38 AM2019-04-04T00:38:22+5:302019-04-04T00:39:19+5:30
शिवसेना-भाजपाने मागील साडेचार वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्राची केवळ फसवणूक केल्याचा घणाघात करीत युतीला आता सत्तेबाहेर काढण्याची वेळ आल्याचे सांगत वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून वंचितांना सर्वांगीण न्याय मिळवून देवू, असा शब्द अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला.
नांदेड : शिवसेना-भाजपाने मागील साडेचार वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्राची केवळ फसवणूक केल्याचा घणाघात करीत युतीला आता सत्तेबाहेर काढण्याची वेळ आल्याचे सांगत वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून वंचितांना सर्वांगीण न्याय मिळवून देवू, असा शब्द अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला.
वंचित बहुजन आघाडीच्या हिंगोली मतदारसंघातील उमेदवार मोहन राठोड यांच्या प्रचारार्थ अॅड. आंबेडकर यांनी बुधवारी हदगाव आणि किनवट येथे प्रचारसभा घेतल्या. हदगाव येथील सभेला मंचावर अण्णाराव पाटील, प्रा. हेमंतराज उईके, उमेदवार मोहन राठोड, जिल्हाध्यक्ष बालाजी खराडे, इश्त्याक अहमद, प्रशांत इंगोले, तालुकाध्यक्ष राम नरवाडे, सुनील सोनाळे आदींची तर किनवट येथील सभेला प्रा. दिलीप मडावी, प्रा. श्याम मुडे, नवशाद खान, शेख मजहर, डॉ. वाठोरे, जे. टी. पाटील, जयवंत कांबळे आदींची उपस्थिती होती.वंचित समाजाला त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी या आघाडीच्या माध्यमातून वज्रमूठ बांधली आहे. याला सर्वस्तरातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगत निवडणुकीत सर्वांनी एकजूट दाखविल्यास महाराष्टÑात चमत्कारिक निकाल लागलेले दिसतील, असा विश्वास आंबेडकर यांनी व्यक्त केला.