शिक्षकांनी जिल्हा परिषदेसमोर वाजविला ढोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 12:53 AM2019-03-03T00:53:52+5:302019-03-03T00:54:22+5:30

नांदेड : जिल्हा परिषदेसमोर शनिवारी दुपारी अचानक ढोलचा आवाज घुमू लागला. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी प्राथमिक व माध्यमिक ...

Teachers dumped the Zilla Parishad | शिक्षकांनी जिल्हा परिषदेसमोर वाजविला ढोल

शिक्षकांनी जिल्हा परिषदेसमोर वाजविला ढोल

Next
ठळक मुद्देआंदोलन : राज्य शिक्षक परिषदेने प्रलंबित मागण्यांकडे वेधले प्रशासनाचे लक्ष

नांदेड : जिल्हा परिषदेसमोर शनिवारी दुपारी अचानक ढोलचा आवाज घुमू लागला. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या रखडलेल्या पदोन्नत्यासंदर्भात हे ढोल बजाओ तसेच घंटानाद आंदोलन केले. या आंदोलनात शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांमधून पदवीधर, विषय शिक्षक, पदोन्नत मुख्याध्यापक, माध्यमिक शिक्षकांची वरिष्ठ वेतनश्रेणी, केंद्रप्रमुख आदी संवर्गाच्या तसेच प्राथमिक शिक्षकांच्या वरिष्ठ वेतनश्रेणी आदेश, भविष्य निर्वाह निधी स्लीप आदी प्रश्न मार्गी लावण्याबाबत राज्य शिक्षक परिषदेच्या नांदेड शाखेने अनेकवेळा निवेदने देवून तसेच शिक्षणाधिकाऱ्यांची शिष्टमंडळाद्वारे प्रत्यक्ष भेट घेऊन मागणी केली आहे. १ सप्टेंबर रोजी शिक्षणाधिकाऱ्यांसह झालेल्या बैठकीत पुढील एक महिन्यात पदवीधर शिक्षक, पदोन्नत मुख्याध्यापकपदाच्या पदोन्नती करण्यात येतील, असे आश्वासन प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी दिले होते. मात्र, त्यानंतर कुठल्याही संवर्गाची पदोन्नती झाली नाही. त्यानंतर याच मागण्यांसाठी राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने २ डिसेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. त्यावेळीही निवेदने देवून मागण्यांकडे शिक्षणाधिकाºयांसह प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. या आंदोलनानंतर शिक्षण सभापती माधवराव मिसाळे यांच्या दालनात शिक्षणाधिकारी दिग्रसकर यांच्यासह मुख्य लेखा वित्त अधिकारी यांच्यासोबत चर्चाही झाली. मात्र शिक्षकांच्या पदरी आश्वासनाशिवाय काहीही पडले नाही.
या आंदोलनात राज्य कार्याध्यक्ष मधुकर उन्हाळे, संजय कोठाळे यांच्यासह अजित केंद्रे, दत्तप्रसाद पांडागळे, दिगंबर पाटील कुºहे, नरसिंग एंड्रलवार, बालाजी पांपटवार, राजेंद्र पाटील, संतोष साखरे, व्यंकट गंदपवाड आदींसह शिक्षक सहभागी झाले होते.
या आहेत शिक्षकांच्या मागण्या
प्राथमिक शिक्षकांमधून पदवीधर विषय शिक्षकांचे पदोन्नतीचे आदेश द्यावेत, डीसीपीएसधारकांच्या कपात करण्यात आलेल्या जमा रकमेच्या पावत्या देण्यात याव्यात, पाच वर्षांपासून प्राथमिक शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणीचे आदेश त्वरित निर्गमित करुन कामात दिरंगाई करणाºया कर्मचाºयांवर कार्यवाही करावी, प्राथमिक शिक्षकांमधून केंद्रप्रमुखाच्या पदोन्नती कराव्यात, पदोन्नत मुख्याध्यापकांचे पदोन्नत्या समुपदेशन घेऊन तसे आदेश निर्गमित करावेत, प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांमधून शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या पदोन्नत्या कराव्यात याबरोबरच प्राथमिक शिक्षकांच्या चटोपाध्याय यादी तसेच वरिष्ठ वेतनश्रेणीचे आदेश तातडीने जारी करावेत, यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

Web Title: Teachers dumped the Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.