K Chandrashekar Rao Live: “धर्म, जातीयवादाच्या नावाखाली देशाचे विभाजन केले जातेय, परिवर्तन काळाची गरज”; केसीआर यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2023 06:21 PM2023-02-05T18:21:17+5:302023-02-05T18:22:00+5:30

K Chandrashekar Rao Live: देशातील अर्थव्यवस्थेवर बोलताना लाज वाटते, या शब्दांत केसीआर यांनी मोदी सरकारवर घणाघात केला.

telangana cm k chandrasekhar rao criticized pm modi govt over water electricity railway economy and political issue | K Chandrashekar Rao Live: “धर्म, जातीयवादाच्या नावाखाली देशाचे विभाजन केले जातेय, परिवर्तन काळाची गरज”; केसीआर यांची टीका

K Chandrashekar Rao Live: “धर्म, जातीयवादाच्या नावाखाली देशाचे विभाजन केले जातेय, परिवर्तन काळाची गरज”; केसीआर यांची टीका

googlenewsNext

K Chandrashekar Rao Live: तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एंट्री घेतली आहे. केसीआर यांची नांदेडमध्ये भव्य सभा झाली. यावेळी त्यांनी 'अब कि बार किसान सरकार'चा नारा दिला. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या तेलंगणा राष्ट्र समिती या पक्षाचे नाव बदलून भारत राष्ट्र समिती असे केले. यावेळी अनेकांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत के. चंद्रशेखर राव यांनी केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली.  

विचारधारा बदलली तर भारत बदलेल. भारताला बदलण्यासाठी आमचा पक्ष खूप प्रयत्न करेल. देशात पाण्याचा मुभलक साठा आहे. कोणत्याच सरकारने कधीच पाण्याचे योग्य नियोजन केले नाही. देशात पाण्याची मोठी समस्या असून, केंद्र सरकार फक्त तमाशा बघत आहे. तसेच देशाच्या कोणत्याही राज्यात २४ तास वीज मिळत नाही. कोणत्याही गोष्टीसाठी मिळत नाही. शेतकऱ्यांना तर शेतीसाठी वीज मिळत नाही. दिवसा, रात्री कधीही वीज जाते. दिवसातून चार-पाच वेळा वीज जाते. अशी परिस्थिती निर्माणच का व्हावी, अशी विचारणा के. चंद्रशेखर राव यांनी केली. 

मोठ-मोठी भाषणे, खोटी आश्वासने या गोष्टी देशातील जनता किती दिवस ऐकणार

मोठ-मोठी भाषणे, खोटी आश्वासने या गोष्टी देशातील जनता किती दिवस ऐकणार, कधीपर्यंत हे सगळे चालणार, असा प्रश्न उपस्थित करत, देशातील जनतेला आणि तरुणांना, युवकांना आम्ही विनंती करतो की, हा परिवर्तनचा काळ आहे. देशात परिवर्तन झाले पाहिजे. देशवासीयांचा संयम सुटला तर उलट-सुलट परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे सांगत केसीआर यांनी केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. 

जगाच्या तुलनेने आपण प्रत्येक क्षेत्रात मागे आहोत

भारत देश पाणी, वीज, पायाभूत सुविधा अशा प्रत्येक क्षेत्रात मागे पडत चालला आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतही अनेक समस्या आहेत. या देशात नेमके काय घडतेय, असा सवाल केसीआर यांनी केला. यासाठी देशातील तरुणांना, बुद्धिजीवींना आवाहन आम्ही आवाहन करतो की, हा परिवर्तनाचा काळ आहे. देशातील चुकीच्या गोष्टी थांबायला हव्यात. देशातील अर्थव्यवस्थेवर बोलताना लाज वाटते, या शब्दांत केसीआर यांनी मोदी सरकारवर घणाघात केला.

 धर्म, जातीवादाच्या नावाखाली देशाचे विभाजन केले जातेय

देशातील जनतेला खोट्या गोष्टी सांगितल्या जात आहेत. धर्म आणि जातीवादाच्या नावाखाली देशाचे विभाजन केले जात आहे. मनमानीपणा सुरू आहे. अशाने आपला देश कुठे जाणार, प्रगती कशी करणार, जगातील इतर देशांची स्पर्धा करत पुढे कसा जाणार, हीच देशातील सत्य परिस्थिती आहे. देशातील जनता, मीडिया परिवर्तनासाठी मोठे योगदान देऊ शकते, असे के. चंद्रशेखर राव यांनी सांगितले. 

दरम्यान, देशातील मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेचा स्पीड सरासरी २४ किमी प्रति तास आहे. तर चीनमधील मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेचा स्पीड सरासरी १२० किमी प्रति तास आहे. अशा परिस्थितीत आपण चीनशी कशी स्पर्धा करणार, या गोष्टी शक्य तरी आहेत का, अशी विचारणाही केसीआर यांनी केली.   

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: telangana cm k chandrasekhar rao criticized pm modi govt over water electricity railway economy and political issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.