टेम्पोची घराला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:08 AM2021-02-05T06:08:16+5:302021-02-05T06:08:16+5:30

अतकूर शिवारात दारू जप्त धर्माबाद : तालुक्यातील अतकूर शिवारात एका शेताजवळ पोलिसांनी अवैध दारू जप्त करून एकाला रंगेहाथ पकडले. ...

Tempo hits home | टेम्पोची घराला धडक

टेम्पोची घराला धडक

Next

अतकूर शिवारात दारू जप्त

धर्माबाद : तालुक्यातील अतकूर शिवारात एका शेताजवळ पोलिसांनी अवैध दारू जप्त करून एकाला रंगेहाथ पकडले. पोलिसांनी यावेळी २ हजार रुपयांची दारू जप्त केली. अन्य एका घटनेत २ हजार ८६० रुपयांची दारू पकडली. चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने दारू बाळगण्यात आली होती. पोलीस शिपाई सचिन गड्डपवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला.

जनशक्ती पॅनलचे यश

देगलूर - तालुक्यातील मौजे लिंगनकेरूर येथील ग्रामपंचायत निवडणुकीत जनशक्ती ग्रामविकास पॅनलचा विजय झाला. विजयी उमेदवारांमध्ये संगीता जाधव, संभाजी वाघमारे, कमलबाई कांबळे, मैना कदम, मुक्ताबाई चव्हाण, हणमाबाई पांडवे, संजय माने यांचा समावेश आहे.

अखंड शिवनाम सप्ताह

देगलूर - तालुक्यातील ढवटाकळी येथे अखंड शिवनाम सप्ताह घेण्यात आला. यानिमित्ताने संगीता हाळे यांचे कीर्तन झाले. कार्यक्रमास बडुरे महाराज, गंगाधर मलकापूरकर, बस्वराज मंडगीकर, राम महाराज, विलास सगरोळीकर, गणेश थोटे, मृदंगवादक संतोष शेटकार, लक्ष्मण चिंचोलीकर उपस्थित होते.

तमलूरमध्ये नवे चेहरे

देगलूर - तालुक्यातील तमलूर ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे संतोष मांडे यांच्या पॅनलने १३ पैकी ९ जागा मिळवल्या. विजयी उमेदवारांमध्ये शिवकुमार गुत्ते, रणजीत आकुलवार, विठाबाई मांडे, श्रीनिवास गड्डमवार, रुक्मीण गायकवाड, जितेंद्र वनंजे, मंगला टेकवार, किरण वनंजे, मीरा पन्हाळे यांचा समावेश आहे. आ. रावसाहेब अंतापूरकर यांनी या सर्वांचा सत्कार केला.

मुख्याध्यापकपदी पुरी

देगलूर - शरणशांती वर्धक हायस्कूलच्या मुख्याध्यापकपदी एस.एस. पुरी यांची नियुक्ती झाली. सोमवारी पुरी यांना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून नियुक्तीपत्र देण्यात आले. यानिमित्ताने पुरी व एम.डी. पटणे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला शंकरलिंग महाराज, सचिव बस्वराज पटणे, रामनाथ पडकंठवार, मुख्याध्यापक मंठाळे, संतोष भाये, शिक्षक पटणे, जोशी, पवार, पोकलवार आदी उपस्थित होते.

पोलिओ मोहिमेला प्रतिसाद

नरसी फाटा - येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राकडून पल्स पोलिओ मोहीम राबवण्यात आली. यावेळी डाॅ. जयश्री राठोड, आरोग्य सेविका एम.जी.तकटे, अंगणवाडी कार्यकर्ता गोदावरी, आशा वर्कर सोफीया बेगम, मोहमद इस्माईल आदी उपस्थित होते.

किनवटमध्ये धरणे आंदोलन

किनवट - भाजप सरकारच्या विरोधात महात्मा गांधी पुण्यतिथी व हुतात्मादिनी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी अर्जुन आडे, शंकर सिडाम, डाॅ. डाखोरे, नगरसेवक अभय महाजन, के.मूर्ती, जनार्दन काळे, प्रदीप राठोड, मधुकर राठोड, ॲड. जाधव आदी उपस्थित होते.

अंतरभारतीची सभा

बिलोली : अंतरभारती शिक्षण संस्थेची सर्वसाधारण सभा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ. गंगाधरराव पटणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. बैठकीला संस्थेचे संचालक, मुख्याध्यापक आदी उपस्थित होते.

पोलिओ डोस

नायगाव : बरबडा व कुंटूर येथील आरोग्य केंद्रात बालकांना पोलिओ डोस देण्यात आले. ज्या पालकांनी अजूनही आपल्या बालकांना डोस दिले नाहीत अशांनी सर्व रुग्णालय, अंगणवाडी शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आदी ठिकाणी जाऊन डोस पाजवून घ्यावा, असे आवाहन डॉ. अनंत पबितवार व गच्चे यांनी केले. लसीकरणप्रसंगी होळकर, शेख, शीला मंगरुळे आदी कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Tempo hits home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.