राज्यराणी एक्स्प्रेसचे दहा डबे प्रवाशांसाठी उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:15 AM2021-07-17T04:15:17+5:302021-07-17T04:15:17+5:30
या गाडीचा उपयोग मनमाड येथून धावणाऱ्या उत्तर भारतात तसेच दक्षिण भारतात जाणाऱ्या रेल्वे गाड्या पकडण्याकरिता होईल. तसेच शिर्डीला जाणाऱ्या ...
या गाडीचा उपयोग मनमाड येथून धावणाऱ्या उत्तर भारतात तसेच दक्षिण भारतात जाणाऱ्या रेल्वे गाड्या पकडण्याकरिता होईल. तसेच शिर्डीला जाणाऱ्या प्रवाशांनाही या १० डब्यांचा उपयोग होईल. मुंबईकडे जाणाऱ्या दुसऱ्या गाड्याही पकडता येतील. परंतु या दहा डब्यांत मनमाडच्या पुढे आरक्षण करता येणार नाही. हे दहा डबे पूर्वीप्रमाणेच मध्य रेल्वेतर्फे मनमाड आणि त्यापुढील रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी राखीव असणार आहेत.
राज्यराणी एक्स्प्रेसचे दहा डबे प्रवाशांना मनमाडपर्यंत उपलब्ध झाले आहेत. गाडी संख्या ०७६११ नांदेड ते मुंबई सी.एस.एम.टी. राज्यराणी गाडीतील १७ डब्यांपैकी १० डबे हे नांदेड ते मनमाडदरम्यान लॉक करूनच आतापर्यंत ही गाडी धावत होती. १७ पैकी फक्त ७ डबेच नांदेड -परभणी-जालना-औरंगाबाद येथील प्रवाशांसाठी नाशिक-कल्याण-ठाणे-मुंबईला जाण्यासाठी उपलब्ध होते. या लॉक केलेल्या १० डब्यांचा प्रवाशांना उपयोग होत नव्हता.