मनपाच्या विकास शुल्कात दहा कोटींची घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:54 AM2021-01-08T04:54:18+5:302021-01-08T04:54:18+5:30
महापालिकेच्या नगररचना विभागाला विकास शुल्क निधीपोटी १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० पर्यंत १७ कोटी ३३ लाख २९ ...
महापालिकेच्या नगररचना विभागाला विकास शुल्क निधीपोटी १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० पर्यंत १७ कोटी ३३ लाख २९ हजार ४०७ रुपयांचे उत्पन्न झाले होते. यंदा मात्र हे उत्पन्न डिसेंबरअखेरपर्यंत ७ कोटी ८१ लाख ६२ हजार ३९५ वर आले आहे. आणखी ३ महिने शिल्लक असले तरीही या तीन महिन्यांत गतवर्षीच्या तुलनेत किती उत्पन्न मिळेल, हाही प्रश्नच आहे.
चौकट----------------------
३५० संचिका प्रलंबित
महापालिकेच्या नगररचना विभागाकडे विकास परवानगीसाठी १ एप्रिल २०२० ते ३१ डिसेंबर २०२० पर्यंत १०३३ संचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्या ६६९ संचिकांना परवानगी दिली आहे. त्यातून ऑफलाइन विकास शुल्कापोटी १ कोटी २५ लाख, तर ऑनलाइन विकास शुल्कापोटी ६ कोटी ५५ लाखांचे उत्पन्न प्राप्त झाले. त्याचवेळी तब्बल ३५० संचिका प्रलंबित असल्याची बाबही पुढे आली आहे. त्यामुळे या संचिका प्रलंबित राहण्याची कारणे कोणती, यावरही चर्चा सुरू झाली आहे, तर दुसरीकडे उत्पन्नाचा स्रोत मर्यादित झाला आहे.